राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल च्या वतीने आटपाडी तालुक्यातील डॉक्टरांना फेसशिल्ड वाटप


राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी डॉक्टर सेल च्या वतीने आटपाडी तालुक्यातील डॉक्टरांना फेसशिल्ड वाटप
माणदेश एक्स्प्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कोरोना विषाणू विरुद्ध लढ्यात जोमाने पुढे असणाऱ्या डॉक्टर समुदायाला मदत करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या वतीने आटपाडी तालुक्यातील डॉक्टरांना फेसशिल्ड देण्यात आले. सदरचा  कार्यक्रम  गुरुवार  दि. 30 एप्रिल रोजी   प्रातिनिधिक स्वरूपात  प्राथमिक आरोग्य केंद्रात जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष हणमंतराव देशमुख, रावसाहेब पाटील, आनंदराव पाटील, भारत पाटील, सरपंच वृषाली पाटील यांच्या हस्ते संपन्न झाला. 
यावेळी डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, युवक तालुका अध्यक्ष सूरज पाटील,  तालुका प्राथमिक आरोग्य अधिकारी,  किशोर गायकवाड, रोहित देशमुख, संभाजी पाटील, इंडियन मेडिकल असोसिएशनचे डॉक्टर, जनरल मेडिकल प्रॅक्टिस असोसिएशन चे सदस्य उपस्थित होते. 


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम!
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा ! आभार गीतपक्षाचे संस्थापक अध्यक्ष शरदचंद्र पवारसाहेब, प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील, डॉक्टर सेलचे प्रदेशाध्यक्ष डॉ.नरेंद्र काळे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्ट  तर्फे राज्यात दीड लाख फेसशिल्डचे वितरण आरोग्य व्यवस्थेमधील डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी यांना केले जात आहे. कोरोना विषाणूच्या संकट काळामध्ये वैद्यकीय सेवा ही आपली  युद्ध भूमी समजून धैर्याने सेवा देत  आहेत अशा सर्व डॉक्टरांना फेसशिल्ड देण्यात येत आहे. साताऱ्यातील सर्व वैद्यकीय संघटना, इंडियन मेडिकल असोसिएशन, जनरल प्रॅक्टिस नर्स असोसिएशन, रूरल हॉस्पिटल ओनर्स असोसिएशन निमा अशा सर्व संघटनेमार्फत करण्यात आले.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured