स्वेरीच्या निवासी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून गोपाळपुरच्या गरजू बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


स्वेरीच्या निवासी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांकडून गोपाळपुरच्या गरजू बांधवांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
पंढरपूर - गोपाळपूर (ता.पंढरपूर) येथील स्वेरी संचलित पदवी व पदविका अभियांत्रिकी, पदवी व पदविका फार्मसी तसेच एम.बी.ए. ही महाविद्यालये सध्या राज्यात अग्रेसर असलेल्या  महाविद्यालयांपैकी आहेत. स्वेरीच्या  कॅम्पसमध्येच वास्तव्यास असलेले शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे मिळून एकूण तीस कुटुंबीय राहतात. सध्या कोरोनाच्या  पार्श्वभूमीवर अडचणीत आलेल्या अनेक कुटुंबियांची उपासमार होत आहे. स्वेरीचे संस्थापक सचिव व अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे सर यांच्या प्रेरणेने अशा गरजुंना काहीतरी मदत करावी या हेतूने स्वेरीच्या सर्व निवासी सदस्यांनी  एकत्र येऊन जवळपास दिडशे कुटुंबियांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. त्यात एक किलो तांदूळ, एक किलो साखर, एक किलो खाद्य तेल,चहा पुडा, साबण, असे साहित्य एकत्रित करून दिडशे किटस तयार करण्यात आल्या. तयार केलेल्या या किटस गोपाळपूर परिसरातील गरजूंना व वृद्धाश्रमातील वृद्धांना देण्यात आल्या. यावेळी गोपाळपूरचे ग्रामपंचायत सदस्य व जेष्ठ नागरिक आदी उपस्थित होते. सदर वस्तुंचे वाटप सोशल डिस्टन्सिंग पाळून करण्यात आले तसेच तेथील नागरिकांना घरातच राहून कोरोना व्हायरसच्या महामारीवर मात करण्यासाठी प्रशासनास सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले. स्वेरीच्या  निवासी सदस्यांनी  केलेल्या या स्तुत्य कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. या उपक्रमात डॉ.अमित गंगवाल, डॉ. भुवनेश्वरी मॅडम, डॉ.एम.एम. आवताडे, प्रा. सुनील भिंगारे, प्रा. करण पाटील, प्रा.संजय मोरे, प्रा.अविनाश कोकरे,प्रा. तांबोळी, प्रा. अंतोश दायडे, प्रा. जाधव मॅडम, प्रा. सिंपले, प्रा. देशमुख, संतोष जाधव, श्रीकांत पवार, संभाजी वलटे, गणेश पाटील, सचिन डुबल, दत्तात्रय बागल, अमोल चंदनशिवे, कुंदन पालकर, बालाजी सुरवसे, विठ्ठल जाधव, मोरे, पवार, शहाजी बचुटे, आंबुरे,पांडूरंग वाघमारे, विठ्ठलकर, म्हमाणे आदी प्राध्यापक व  शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured