संचारबंदी असताना सामुहिक नमाज पठाण  ; माजी नगरसेवकाचा पुढाकार ; मौलानासह, आयोजक व ४१ नागरिक ताब्यात

संचारबंदी असताना सामुहिक नमाज पठाण  ; माजी नगरसेवकाचा पुढाकार ; मौलानासह, आयोजक व ४१ नागरिक ताब्यात


संचारबंदी असताना सामुहिक नमाज पठाण 
माजी नगरसेवकाचा पुढाकार ; मौलानासह, आयोजक व ४१ नागरिक ताब्यात


माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : एकीकडे कोरोनामुळे संपूर्ण देशामध्ये संचारबंदी व जमावबंदी आहे. त्यातच दिल्लीतील निजामुद्दीन तब्दिली मरकज कार्यक्रमास जमलेल्यांना कोरोनाची लागण झाली असून यातून मुस्लीम समाजातील लोक अजूनही बोध घेत नसल्याचे मिरज येथे पाहवयास आले असून सामूहिक नमाज पठण करण्याकरिता मशिदीमध्ये जमलेल्या ४१ नागरिकांना पोलिसांनी पकडले असून यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सांगली जिल्ह्यात संचारबंदी आणि जमावबंदीची कडक अंमलबजावणी सुरू आहे. त्यासाठी सर्व धार्मिक स्थळांना मधील सामुदायिक प्रार्थना आणि अन्य विधींना सक्त मनाई करण्यात आली आहे. तरीही येथील मिरज मटण मार्केट नजीकच्या बरकत मशिदीमध्ये आज दुपारी सामुदायिक नमाज पठणाचे आयोजन करण्यात आले. याप्रकरणी माजी नगरसेवक साजिदअली पठाण यांनी पुढाकार घेतल्याचे पोलिसांच्या प्राथमिक चौकशीत उघडकीस स्पष्ट झाले. पोलिसांनी तातडीने बरकत मशिदीजवळ जाऊन नमाज पठणामध्ये सहभागी झालेल्या सर्वांना ताब्यात घेतले. यावेळी काहीजणांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. परंतु या सर्वांना पोलिसांनी पाठलाग करून ताब्यात घेतले.या सर्वांविरुद्ध गुन्हे दाखल केले जाणार आहेत.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a comment

0 Comments