माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याकडून गरजूंना मदत ;  निंबवडेत दानतीचा महापूर

माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याकडून गरजूंना मदत ;  निंबवडेत दानतीचा महापूर


माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्याकडून गरजूंना मदत ;  निंबवडेत दानतीचा महापूर
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : आज दि. १७ रोजी निंबवडे येथे कार्यरत पत्रकार राघव मेटकरी यांना माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचा अचानक फोन येतो.... कोरोनाबाबत चौकशी होते.....  आणि गावची परिस्थिती विचारली जाते. तेव्हा राघव मेटकरी त्यांना ग्राउंड झिरो वरून परिस्थिती सांगतात.  न्यू माणदेश युथ फौंडेशन आणि काही दानशूर व्यक्ती मदत करत असूनही, अजून मदतीची गरज असल्याचे सांगितल्या नंतर क्षणाचाही विलंब न करता रसद घेऊन निंबवडे गावात दाखल झालेले माजी आमदार सदाशिवराव पाटील यांच्या दनशूरतेची गावात चर्चा आहे.
निंबवडे परिसरात कर्तव्य समजून गरजू लोकांना जीवनावश्यक वस्तूचे किट वाटप करण्यात आले. यावेळी  माजी आमदार अॅड सदाशिवराव भाऊ पाटील, अॅड. बाबासाहेब मुळीक, प्रा.एन.पी. खरजे, हिंदूरावशेठ थोरात, रमेश शिंदे, बाबा पिंजारी, नानासाहेब देवडकर, राघव मेटकरी, कुमार माने, सुखदेव खताळ, वैभव पावणे, विलास खरजे व सर्व पदाधिकारी आणि ग्रामस्थ बंधू भगिनीं उपस्थित होते. 
कोरोना च्या लॉकडाऊन परिस्थितीत पुन्हा एकदा माणुसकीचे दर्शन घडविले. सर्वसामान्य जनतेला आधार देण्याचे काम करणारे व जनतेच्या सुखा दुःखात कायमच सक्रियपणे सहभाग घेऊन केलेल्या  सहकार्याबद्दल जनतेमधून कौतुक व्यक्त करण्यात येत आहे.


दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a comment

0 Comments