विटा पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांची सामाजिक बांधिलकी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कन्या आरुषीच्या वाढदिनी गरजू गरीबांना मदतीचा हात..!

विटा पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांची सामाजिक बांधिलकी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कन्या आरुषीच्या वाढदिनी गरजू गरीबांना मदतीचा हात..!


विटा पालिकेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांची सामाजिक बांधिलकी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कन्या आरुषीच्या वाढदिनी गरजू गरीबांना मदतीचा हात..!
माणदेश एक्सप्रेस न्युज
विटा/प्रतिनिधी : संपूर्ण देशभरात कोरोना चे संकट ओढावले असताना अनेकांचे मदतीसाठी हात सरसावले आहेत. विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांनी अहोरात्र प्रयत्न करुन शहराला सुरक्षित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या कन्येचा वाढदिवस आणि या दिवसाचे औचित्य साधत कोरोनाच्या ओढावलेल्या संकटामध्ये अनेकांची वाताहात झाली आहे. कर्तव्यासोबत मदतीचे  दातृत्व पाटील परिवाराने दाखवत नवा आदर्श निर्माण केला आहे.
विटानगर परिषदेचे मुख्याधिकारी अतुल पाटील यांची कन्या कु.आरुषी हिचा वाढदिवसाच्या निमित्ताने एक वेगळेपण दिसून आलं. या चिमुकलीने वाढदिवस थाटामाटात न साजरा करता मुख्यमंत्री सहाय्यता निधीस मदत केली आहे, व नगरपरिषद हद्दीतील गरजू हातावरचे पोट असणाऱ्या अनेक असहाय्य कुटुंबांना स्वखर्चाने जीवनावश्यक वस्तूंचे किट चे वाटप करण्यात आले. अनोख्या पद्धतीने एक वाढदिवस साजरा होत असल्याचे पाहून प्रत्येकाचा उर अभिमानाने भरुन येत आहे.
विटा नगरपरिषद हद्दीतील गरजू व असाह्य परिवारांना वाढदिवसाचे औचित्य साधत जीवनावश्यक वस्तू दिल्या आहेत. आपण समाजाचे काही देणे लागतो. आपण आपल्यासोबत अनेकांची दुःखे जाणून मदतीसाठी तत्परता दाखवणे हीच खरी माणुसकी आहे. विटा नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हणून आपल्या कामाचा ठसा उमटवणारे मुख्याधिकारी अतुल पाटील यांच्या कन्येच्या वाढदिनी केलेल्या सामाजिक कार्याने अनेकांच्या संसाराला हातभार लागेल. व लवकरच या महाभयंकर संकटावर आपण मात करु असा विश्वास यावेळी व्यक्त होत आहे. मुख्यमंत्री सहाय्यता निधी व गरजू लोकांना मदत केलेल्या अतुल पाटील यांच्या परिवाराचे कौतुक यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील,  माजी नगराध्यक्ष वैभव पाटील तसेच तहसिलदार ऋषिकेश शेळके व प्रशासनाने व विटेकर नागरिकांनी केले आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a comment

0 Comments