मेंढपाळ बांधवांना गावाला येऊ द्या : पुष्पाताई सरगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


मेंढपाळ बांधवांना गावाला येऊ द्या : पुष्पाताई सरगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
निबंवडे/राघव मेटकरी : माणदेशाचा मेंढपाळ पोटाच्या मागे पाण्याच्या भागात पूर्वापार जात आला आहे. त्यासाठी गावाकडे सर्व घरदार जमीन जुमला सोडून हातावर पोट घेऊन वाटेला गेलेला माणूस आज कोरोना च्या पार्श्वभूमीवर आडवाटेला अडकून पडला आहे. त्यांच्याकडे प्रत्येक गावातील माणूस संशयाने पाहत असून त्यांना शिधा मिळणे सुद्धा अवघड जात असल्याच चित्र आहे. 


हे ही वाचा :-  मागासवर्गीय १५ टक्के निधीतुन अनुसुचित जाती व जमातीच्या व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करा : राजेंद्र खरात यांचे प्रशासनाला निवेदनाद्वारे मागणी


परदेशातून असलेल्या लोकांना सरकार घेवून येत आहे त्यामुळे आता आमच्या मेंढपाळ बांधवांना घेऊन येण्याचीमदत करावी अशी मागणी आटपाडी पंचायत समितीच्या माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्या पुष्पाताई जयवंत सरगर यांनी मुख्यमंत्री महोदयांना पत्र लिहून केली आहे.इथला माणूस पोटाच्या मागे परंपरेने जात आला आहे. अतिशय अनिश्चित वातावरणात तो अडकला आहे. म्हणून थेट मुख्यमंत्री महोदयांनी यात लक्ष घालून आमच्या मेंढपाळ बांधवांना आपापल्या घरी सुखरूप पोहोच करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे.
सौ. पुष्पाताई जयवंत सरगर
माजी उपसभापती पं.स.आटपाडी


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured