आटपाडीत संभाजीशेठ पाटील यांच्या वतीने धान्य वाटप

आटपाडीत संभाजीशेठ पाटील यांच्या वतीने धान्य वाटप


आटपाडीत संभाजीशेठ पाटील यांच्या वतीने धान्य वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/सचिन कारंडे : आटपाडी शहरामध्ये सुरज अपार्टमेंट येथे गुरुवार २ रोजी युवानेते संभाजीशेठ पाटील यांच्या वतीने गरजू व गरीब कुटुंबीयांना सोशल डिस्टस्निग चे नियम पाळत धान्याचे वाटप करण्यात आले. यावेळी आटपाडी ग्रामपंचायत  सरपंच वृषाली पाटील, ॲड. धनंजय पाटील, डीडीएफ संघटनेचे उपाध्यक्ष अशोक पाटील, शिक्षक बँकेचे माजी चेअरमन यु.टी. जाधव सतीश पाटील, पी.एस.जरे, दिलीपशेठ कदम आदी मान्यवर उपस्थित होते.
युवा नेते संभाजीशेठ पाटील हे नेहमीच समाजकार्य करण्यात अग्रेसर असतात आज कोरोना विषाणूमुळे महाराष्ट्रामध्ये संख्या वाढत आहे सांगली जिल्ह्यामध्ये २५ कोरोना चे रुग्ण आढळले आहेत. आटपाडी शहरामध्ये संचारबंदी असल्याने गरजू व गरीब  कुटुंबांचे हाल होत आहे. समाजसेवा म्हणून संभाजीशेठ पाटील यांच्यावतीने  सुरज आपारमेंट मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत धान्याचे वाटप करण्यात आले. 300 किलो गहू व 500 किलो तांदूळ असे वाटप करण्यात आले. संभाजीशेठ पाटील स्वतः हजर न राहता त्यांनी दिलेले सामाजिक योगदानाचे  सर्वत्र कौतुक होत आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments