आटपाडी पोलीसांचे माणुसकीचे दर्शन ; निराधारांना दिला आधार

आटपाडी पोलीसांचे माणुसकीचे दर्शन ; निराधारांना दिला आधार


आटपाडी पोलीसांचे माणुसकीचे दर्शन ; निराधारांना दिला आधार
संचारबंदी असेपर्यंत बेघर, वृद्ध यांना दोनवेळचे जेवण देण्याचा ध्यास 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : आटपाडी येथे पोलीस कर्मचाऱ्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले असून बेघरांना रोज जेवण देऊन माणुसकीचे ते दर्शन घडवत आहे. देशभर कोरोना विषाणूचा प्रभाव वाढत असून शहरात संचारबंदी असल्याने गावातील हॉटेल, खानावळ बंद असून अशावेळी बसस्थानकात जवळील व इतर भागात असलेले बेघर, वृद्ध यांची उपासमार होत असल्याचे पाहून आटपाडी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, सचिन पाटील व गुप्तवार्ता विभागाचे माऊली पवार यांनी लोकांना सुरक्षित ठेवण्यासह येथील वृद्धांना संचारबंदी असेपर्यंत रोज दोन वेळचे जेवण देण्याचे ध्यास घेतला असून समाजाच्या सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. पोलिसांची दहशत, दरारा, भीती, काठीचा मार अशी सर्वसामान्यांची समजूत असून तेही एक आपल्यातील आहे या भावनेने संचारबंदी असेपर्यंत निराधारांना रोज दोन वेळचे जेवण देण्याचा संकल्प केला असून आटपाडी पोलिसांनी माणुसकीचे दर्शन जगाला दाखवून दिले आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments