कोरोनाच्या लढ्यात मदतीला धार, निंबवडेकरांना युवकांचा आधार !!

कोरोनाच्या लढ्यात मदतीला धार, निंबवडेकरांना युवकांचा आधार !!


कोरोनाच्या लढ्यात मदतीला धार, निंबवडेकरांना युवकांचा आधार !!
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे येथे सामाजिक कार्यकर्ते तसेच निंबवडे ग्रामपंचायत सदस्य डॉ रावसाहेब पाटील यांच्या वतीने गरजू व्यक्तींना किराणा मालाचे वाटप करण्यात आले. यावेळी युवा नेते जयवंतराव सरगर याची प्रमुख उपस्थिती होती. 
निंबवडे गावात कोरोना च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यात येत असून पुणे, मुंबई च्या लोकांच्या येण्यामुळे विशेष काळजी घेण्यात सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार अजोड मेहनत घेताना दिसत आहेत. अशावेळी दुसरी बाजू हातावर पोट असलेल्या लोकांची पोटाची काळजी मिटवण्यासाठी तरुणाई पुढे सरसावली असून स्वखुशीने पुढे येऊन लोकांच्या चुली पेटतील याबाबत काळजी घेण्यात येत आहे. डॉ रावसाहेब पाटील हे कायम सामाजिक कार्यात सक्रिय असलेलं नेतृत्व असून त्यांनी गावातील कुणाच्याही मदतीला धावून जाण्याचा रतीब कायम ठेवला आहे या मदतीच्या वाटपाच्या वेळी युवा नेते जयवंत सरगर, डॉ. गाढवे, डॉ.बी.टी. पिंजारी, दिलीप मोटे, नानासाहेब झुरे उपस्थित होते. न्यू माणदेश युथ फाउंडेशन च्या माध्यमातून गावात होत असलेले कार्यक्रम आणि मामा नानासाहेब झुरे यांचे मार्गदर्शन यामुळे सामाजिक कामात पहिल्यापासून सक्रिय असून कोरोना च्या पार्श्वभूमीवर लोकांना होत असलेल्या मदतीत आपला वाटा असावा म्हणून मदत करत आहे भविष्यात सुद्धा गरज पडल्यास लोकांची काळजी घेण्याचा प्रयत्न असणार आहे
डॉ. रावसाहेब पाटील 
ग्रा.प. सदस्य निंबवडे


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments