कोरोना विषाणु संसर्गाचे गांभीर्य आटपाडीकरांना येईना लक्षात ; विनाकारण, कामाशिवाय तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या ८ नागरिकांना प्रत्येकी ४००० रुपयांचा दंड

कोरोना विषाणु संसर्गाचे गांभीर्य आटपाडीकरांना येईना लक्षात ; विनाकारण, कामाशिवाय तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या ८ नागरिकांना प्रत्येकी ४००० रुपयांचा दंड

 कोरोना विषाणु संसर्गाचे गांभीर्य आटपाडीकरांना येईना लक्षात
विनाकारण, कामाशिवाय तोंडाला मास्क न लावता फिरणाऱ्या ८ नागरिकांना प्रत्येकी ४००० रुपयांचा दंड
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : जागतीक महामारी जाहीर करणेत आलेल्या कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी आटपाडी पोलीस ठाणे हद्दीतील सर्व गावांमध्ये वारंवार ध्वनीक्षेपावरून नागरीकांना आवाहन करून कोरोना विषाणुचा संसर्ग टाळण्यासाठी नागरीकांनी घरातच थांबावे विनाकारण घराबाहेर पडु नये. याबाबत जिल्हाधिकारी सो सांगली यांनी संचारबंदी आदेश तसेच मनाई आदेश लागु केलेला आहे. परंतु कोरोना विषाणु संसर्गाचे गांभीर्य लक्षात न घेता विनाकारण, कामाशिवाय तोंडाला मास्क न लावता फिरत असणाऱ्या नागरिकांवर खटले नोंद करण्यात आलेले आहेत. यामध्ये  १) ऋषीकेश ज्ञानदेव जाधव वय २२ व्यवसाय किराणा दुकान रा विदयानग ओंकार आपर्टमेंट आटपाडी २) मैनुदीन राजु मलाणी वय २० व्यवसाय मटण दुकान रा मुलानकी आटपाडी ३) प्रदिप शामराव कदम रा ३९ व्यवसाय मजुरी रा. गोमेवाडी ता आटपाडी. ४) अनिल सदाशिव पाटील वय २० व्यवसाय शेती रा शेटफळे ता आटपाडी. ५) सर्जेराव दाजी कोळेकर रा मिटकी ता आटपाडी. ६) सुरेश आण्णा शिंदे वय रा ५९ रा तळेवाडी ता आटपाडी ७) विलास मधुकर खर्जे वय ३० रा विभुतवाडी ता आटपाडी. दि. १६/०४/२० यांचे विरुध्द आटपाडी पोलीस ठाणेस भादंविसं कलम १८८,२६९.२७०,२७१ प्रमाणे खटले नोंद करुन त्यांना दि.१७/०४/२०२० रोजी मा प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी सो, आटपाडी यांचे न्यायालयात हजर केले असता. मा. न्यायालय आटपाडी यांनी प्रत्येकी ४०००/-रु दंड असा २८,०००/-रु दंड केला आहे. सदरची कारवाई आटपाडी पो. ठाणेचे पोलीस निरीक्षक बी.ए. कांबळे यांचे मार्गदर्शनाखाली सपोनि सुधीर पाटील, सपोनि गभाले, पोउपनि. अजित पाटील, पोउपनि प्रकाश कांबळे तसेच सपोफी चोरमुले, शिवाजी भोते, सपोफी कंकणवाडी, पोहेको नंदकुमार पवार, पोहेकॉ गणपत गावडे, पोहेकॉ शैलेंद्र कोरवी, पोना रामचंद्र खाडे, पोना. दिग्वीजय कराळे, पोकॉ सचिन पाटील, पोकॉ सौरभ वसमाळे, पोकॉ नितीन मोरे, पोकॉ अतुल माने, मपोकॉ यलपले, मपोकॉ शुभागी भगत अशांनी केली आहे.


 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments