अजनाळे गाव हेच कुटुंब मानून संपूर्ण गावाची काळजी घेत आहेत आशा वर्कर 

अजनाळे गाव हेच कुटुंब मानून संपूर्ण गावाची काळजी घेत आहेत आशा वर्कर 


अजनाळे गाव हेच कुटुंब मानून संपूर्ण गावाची काळजी घेत आहेत आशा वर्कर 
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सरकारने राज्यात संचारबंदी व लाँकडाउन जाहीर केले आहे. शासनाकडून या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत. मुंबई-पुणे यासारख्या मोठ्या शहरातून नागरीक आपल्या मूळ गावी आल्यामुळे गाव पातळीवर काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात जबाबदारी निर्माण झाली आहे. 
अजनाळे गावातील आरोग्य सेवक डॉ अशोक कलाल, आरोग्य सेविका सुजाता गुरव, आशा वर्कर ज्योती येलपले, पल्लवी धांडोरे, रंजना येलपले, यांनी गावात वाड्या-वस्त्यांवर प्रत्येक घर कुटुंबापर्यंत घरोघरी जाऊन घरात माणस किती? बाहेर गावाहून कोण आले आहे का?  सर्दी, खोकला, ताप यासारखा आजार घरामध्ये कोणाला आहे का? असेल तर जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन आरोग्याची तपासणी करा असा सल्ला देऊन, आशा वर्कर या कोरोना विषाणू  च्या संकटात आज खरोखरच राष्ट्रीय काम चोख बजावत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे. 
तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या अशा वर्कर यांना गाव हेच कुटुंब मानून संपूर्ण गावाची काळजी घेत आहेत. अजनाळे गावांमध्ये 5 हजार 278 लोकसंख्या असून लोक वाड्या-वस्त्यावर  मोठ्या प्रमाणात राहत असल्यामुळे आशाताईंना याची जबाबदारी मात्र नम्रपणे पार पाडावी लागत आहे. प्रशासनाच्या इतर घटकांसोबत खांद्याला खांदा लावून कोरोनाशी दोन हात करताना दिसत आहेत. गाव हेच कुटुंब म्हणून प्रत्येकाच्या आरोग्याची काळजी केली जाते. प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन शासनाच्या सूचनांचे पालन करा, गर्दी टाळा, गर्दी करू नका, वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवा, घराच्या बाहेर पडू नका, कोरोना विषाणूचा संसर्ग व प्रादुर्भाव पसरण्याची शक्यता लक्षात घेता आपल्या जीवावर उदार होऊन  ग्रामीण भागातल्या आशाताई काम करत असल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात दिसत आहे. जगभर थैमान घालणाऱ्या रोगाला गावातून हद्दपार करण्यासाठी सुरुवातीपासूनच आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आशा वर्कर रात्रंदिवस काम करीत आहेत. गाव पातळीवर काम करत असताना वेगवेगळ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.  कोरोना विषाणूला हद्दपार करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य असणे गरजेचे आहे. नागरिकांनी आरोग्याची काळजी घेतली पाहिजे. शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन केले पाहिजे. 

गावातील नागरिकांनी परगावाहून आलेल्या नागरिकांची तात्काळ माहिती आरोग्य केंद्राकडे द्यावे जर कोणाला सर्दी खोकला ताप अशी लक्षणे दिसल्यास तात्काळ आरोग्य केंद्राशी संपर्क साधावा.  शासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे 
आरोग्य सेवक


डॉ.अशोक कलाल, अजनाळे


Post a comment

0 Comments