आटपाडीत पोलिसांना मसाला ताकाचे वाटप सागर पान शॉप यांचा उपक्रम ; पोलीसही आपल्यातले एक आहेत या भावनेने वाटप


आटपाडीत पोलिसांना मसाला ताकाचे वाटप
सागर पान शॉप यांचा उपक्रम ; पोलीसही आपल्यातले एक आहेत या भावनेने वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन असल्याने व पोलीस कर्मचारी अहोरात्र आपले कर्तव्य बजावत आहेत. याच बरोबर होमगार्ड कर्मचारी देखील चोवीस तास सेवा देत आहेत. कोरोना विषाणूचा संसर्ग नागरिकांना होऊ नये यासाठी घरीच राहण्याचा विनंती करत असताना हे सर्व जण आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर सेवा बजावत आहेत. मात्र २४ तास रस्त्यावर आपले कर्तव्य बजावणारे आपला जीव धोक्यात घालणाऱ्या पोलीस कर्मचारी आपल्या घराची व कुटुंबाची काळजी असतानाही जनतेची सेवा करणारा प्रसंगी गोरगरिबांना मदत करणारा कर्तव्य बजावणारा पोलीस कर्मचारी दुर्लक्षित असतो याची दखल घेऊन गेल्या चाळीस वर्षापासून जिद्द चिकाटीच्या जोरावर सागर पान शॉप चे मालक सुरेश सागर यांनी दूध व दुग्धजन्य पदार्थाचे एजन्सी घेऊन एक पाऊल पुढे टाकले. ग्राहकांचा विश्वास गुणवत्ता सचोटी व घरातील सर्व सदस्यांची साथ घेऊन यशस्वी झाले. मात्र पोलीस हेदेखील आपल्यातील आहेत याचे सामाजिक भान ठेवून सुरेश सागर  उर्फ कांता सागर, रोहित सागर यांनी भर उन्हात कर्तव्य बजावणाऱ्या पोलिसांना थंड ताक पिण्यासाठी देण्याचा उपक्रम बसस्थानकाजवळील देशपांडे कॉम्प्लेक्स येथे राबवला गेला. ताजे मसाले ताक पोलीस कर्मचाऱ्यांना थंडावा देत आहे या स्तुत्य उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक होत आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured