देवापूर येथे रक्तदान शिबीर संपन्न ; युवक काँग्रेस व एन.एस.यु.आय.यांच्या वतीने आयोजन 


देवापूर येथे रक्तदान शिबीर संपन्न ; युवक काँग्रेस व एन.एस.यु.आय.यांच्या वतीने आयोजन 
माणदेश एक्सप्रेस न्युज
देवापूर/डॉ.सागर सावंत : कोरोना या संसर्गजन्य विषाणूच्या च्या पार्श्वभूमीवर राज्याच्या रक्ताचा तुटवडा होवू नये, गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे यासाठी देवापूर येथे ता. जि. सातारा येथे माण-खटाव विधानसभा युवक काँग्रेस  व विद्यार्थी काँग्रेस यांच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले.
सध्या रक्ताची गरज भासत असून यासाठी रक्तदान शिबीराचे आयोजन करणे गरजेचे झाले आहे. यासाठी गरजूंना वेळेत रक्त उपलब्ध व्हावे म्हणून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस चे प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सरचिटणीस शिवराज मोरे यांच्या सुचनेनुसार व महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव दादासाहेब काळे व जिल्हा अध्यक्ष विराज शिंदे यांच्या सहकार्यातून  तसेच युवक काँग्रेसचे माणखटाव विधानसभा सरचिटणीस डॉ.सागर सावंत व सातारा जिल्हा विद्यार्थी काँग्रेस चे सरचिटनिस पंकज पोळ यांनी रक्तदान शिबिर घेतले. 
यावेळी रक्तदान करणाऱ्या प्रत्येकाला पोलीसांनी अडवू नये म्हणून टोकन पद्धत व सोशल डिस्टंसींग पद्धतीचा अवलंबन करत प्रत्येक रक्तदान करणाऱ्याला  वेळ ठरवून देण्यात आली होती. यामूळे शिबीर व्यवस्थीत पार पडले. यावेळी ४६ रक्तदात्यांनी रक्तदान केले. यात महीलांनी विशेष सहभाग नोदविला. यावेळी वेळी म्हसवड पोलीस स्टेशन चे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश वाघमोडे, म्हसवड चे माजी नगराध्यक्ष विजय धट, देवापूर गावचे सरपंच संजय जाधव, बिजवडीचे उपसरपंच योगेश भोसले, टाटा समुहाचे कुलकर्णी व प्रसाद मेहता हे प्रमुख उपस्थित होते. अक्षय ब्लड बँक सातारा यांच्या सहकार्याने चे रक्तदान शिबीर संपन्न झाले.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured