होम क्वॉरंटाईन शिक्का असून सार्वजनिक ठिकाणी वावर ; म्हसवड येथील रिक्षा ड्रायव्हरचे कृत्य ; म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 


होम क्वॉरंटाईन शिक्का असून सार्वजनिक ठिकाणी वावर 
म्हसवड येथील रिक्षा ड्रायव्हरचे कृत्य ; म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : होम क्वॉरंटाईन शिक्का मारलेला मुंबई येथील रिक्षा ड्रायव्हर अशोक पांडूरंग कवडे हा गावी म्हसवड येथे आला असून, तो घरात न थांबता तोंडाला मास्क न वापरता, सार्वजनिक ठिकाणी फिरून संसर्ग पसरविणयाचे घातक कृत्य करत असल्याच्या कारणावरून टॅफिक हवालदार संतोष बागल यांनी गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, मुंबई येथे रिक्षा ड्रायव्हर असलेला व होम क्वॉरंटाईन शिक्का मारलेला अशोक पांडूरंग कवडे हा गावी म्हसवड येथे आला असून तो काल म्हसवड परिसरात शिंगणापूर चौकात भाजी मंडई येथे भाजी खरेदी करत असताना रस्त्यावर स्वयंमसेवक म्हणून कार्यरत असलेले माजी नगरसेवक युवराज सुर्यवंशी, नगरसेवक धनाजी माने, किशोर सोनवणे, किरण कलढोणे, कैलास भोरे यांच्या लक्षात आल्या नंतर त्यांनी सदर बाब म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि गणेश वाघमोडे यांच्या माहिती दिली असता वरील आरोपी अशोक कवडे यास ट्रॅफिक हवलदार संतोष बागल यांनी जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी आरोपी कवडे यांच्या वर सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही समर्पक कारणाशिवाय फिरत असल्याचे आढळून आल्याच्या कारणावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून सपोनि गणेश वाघमोडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक आर बी कुंभार पुढील तपास करत आहेत.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured