लॉकडाऊन संपेपर्यंत ५० बंगाली कारागिरांना एकवेळचे जेवण ; आटपाडीतील प्रसादशेठ जवळे यांचा कन्या श्रीशा च्या वाढदिवसानिमित्त संकल्प 


लॉकडाऊन संपेपर्यंत ५० बंगाली कारागिरांना एकवेळचे जेवण 
आटपाडीतील प्रसादशेठ जवळे यांचा कन्या श्रीशा च्या वाढदिवसानिमित्त संकल्प 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : पैसा, घर, बंगला, गाडी आल्यावर माणूस मागे वळून बघत नाही. परंतु समाजात असे अनेक लोक असतात की त्याचे पाय नेहमीच जमिनीवर असतात. किती यश मिळाले तरी त्याच्या मनातून माणुसकी कधीही निघून जात नाही. हसतमुख स्वभाव सगळीकडे मिळून-मिसळून वावरणारा प्रचंड मित्रपरिवार अशापैकी प्रसादशेठ जवळे यांच्याकडे पहिले जाते.
सध्या कोरोना पार्श्वभूमीवर सराफी दुकान बंद असल्याने व हाताला काम नसल्याने बंगाली कारागीर घरी बसून आहेत ही गरज ओळखून प्रसादशेठ जवळे यांनी त्यांची कन्या श्रीशा हिच्या वाढदिवसानिमित्त लॉक डाऊनलोड संपेपर्यंत सध्याची परिस्थिती पाहता हजारो किलोमीटर येऊन वास्तव्यास असलेल्या ५० बंगाली कारागिरांना एक वेळ जेवणाची घरपोच सोय करून अनोख्या प्रकारे कन्येचा वाढदिवस साजरा करून कृतीतून दाखवून दिला. नेहमीच सामाजिक बांधिलकी जपत जवळे उद्योग समूह कार्यरत असून आपुलकीने विचारपूस करून सगळ्यांच्या सुखदुःखात सहभागी होऊन प्रत्येक क्षेत्रात ठसा उमटवणारे प्रसादशेठ जवळे यांचे अनुकरण इतरांनी करून त्यांचा आदर्श घेण्यासारखा आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured