दिडवाघवाडी ग्रामपंचायतीची आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा संपन्न 

दिडवाघवाडी ग्रामपंचायतीची आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा संपन्न 


दिडवाघवाडी ग्रामपंचायतीची आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा संपन्न 
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : महाराष्ट्रातील कोरोनाचे संकट दिवसेंदिवस गंभीर होत आहे. संकटाचा सामना करण्यासाठी जाहिर केलेला २१ दिवसांचा लॉककडाऊन पूर्ण झाला आहे. गेल्या काही दिवसात महाराष्टातील कोरोना बाधितांची संख्या वाढत चालली आहे. या पार्श्वभूमीवर दिडवाघवाडी ग्रामपंचायतीचे सरपंच बाळासाहेब काळे यांनी गावात आपत्ती व्यवस्थापन समितीची सभा घेऊन गावात केलेल्या उपाययोजना जंतुनाशक ऒषध फवारणी, फॉलिडॉल पावडर धुरळणी तसेच लोकांमध्ये कोरोना विषयी जनजागृती व्हावी यासाठी स्पीकरद्वारे पुरेशी प्रसिद्धी करण्यात आली असल्याचे सांगीतले. गावामध्ये बाहेरून आलेल्या नागरिकांना योग्य ती काळजी घेण्याबाबत सुचना देण्यात आल्या आहेत. लॉककडाऊनचा कालावधी ३ मे पर्यंत वाढवण्यात आल्याने व संचारबंदी लागू असल्याने गावातील कोणीही बाहेर जाणार नाही तसेच बाहेरून कोणीही गावात येणार नाही हे नियम मोडणारा विरोधात पोलिसात गुन्हे नोंद करून विलगीकरन कक्षात ठेवणेत येणार असलेचे पोलिस पाटील यांनी सांगितले. याबाबत सर्वांनी दक्ष राहण्याची व आपल्या गावातील सर्व नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी  सहकार्य करण्याचे आवाहन ग्रामसेवक, तलाठी, कृषीसहाय्यक व सरपंच बाळासाहेब काळे यांनी केले आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments