म्हसवड शहर व परिसरात परजिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या ३० जणांवर गुन्हे दाखल

म्हसवड शहर व परिसरात परजिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या ३० जणांवर गुन्हे दाखल


म्हसवड शहर व परिसरात परजिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या ३० जणांवर गुन्हे दाखल
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड पोलीस व पोलीस पाटील यांनी दुसऱ्या जिल्ह्यातून व दुसऱ्या राज्यातून आलेल्या ३० जणांवर म्हसवड पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
याबाबत म्हसवड पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी,  सुरक्षेच्या दृष्टीकोणातून खबरदारी न घेता मानवी जीवन व व्यक्तीगत सुरक्षा धोक्यात येईल अशा पद्धतीने सार्वजनिक रस्त्यावर फिरुन संसर्ग पसरवण्याचे घातक कृत्य करुन कोरोना विषयी संसर्ग व प्रादुर्भाव रोखण्यासाठी मा.जिल्हाधिकारी सातारा यांचेकडिल आदेश क्रमांक डीसी/एमएजी/२/एसआर/२२/२०२० व आदेश क्रमांक डीसी/एमएजी/२/एसआर/१९/२०२० व आदेश क्रमांक नैआ/कवि/८०४/२०२० प्रमाणे जिल्ह्यातील कलम १४४ प्रमाणे जमावबंदी लागू असताना आदेशाचे उल्लघन करुन सार्वजनिक रस्त्यावर समर्पक कारणाशिवाय फिरत असताना तसेच शासनाने दिलेले निर्देशाप्रमाणे संचारबंदी असताना त्याचे उल्लघन करुन परजिल्ह्यातून व परराज्यातून आलेल्या एकूण ३० जणांवर भारतीय दंड संहिता कलम १८८ २६९ आपत्ती व्यवस्थापण अधिनियम कलम ५१(ब) व महाराष्ट्र कोवीड १९ उपाययोजना कलम ११ प्रमाणे ७ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
सदरची कारवाई म्हसवड पोलीस ठाण्याचे सपोनि गणेश वाघमोडे यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये सपोफौ डोईफोडे पो.कॉ.अस्वले, महिला पो.कॉ.खाडे म्हसवड पोलीस स्टेशन हद्दीतील पोलीस पाटील बनगरवाडी, वरकुटे मलवडी, महाबळेश्वरवाडी, काळचौडी, दिवड, इंजबाव, वरकुटे म्हसवड इ.पोलीस पाटील यांचा सहभाग होता.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments