दिघंची येथील सुरेश आरबळे यांच्या रास्तभाव धान्य दुकानाची चौकशी करा ;  नागरिकांचे तहसीलदार यांना लेखी निवेदन


दिघंची येथील सुरेश आरबळे यांच्या रास्तभाव धान्य दुकानाची चौकशी करा ;  नागरिकांचे तहसीलदार यांना लेखी निवेदन
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : दिघंची ता. आटपाडी, जि. सांगली येथील रास्तभाव धान्य दुकानदार सुरेश आरबळे याच्या मनमानी कारभाराची चौकशी करण्याची मागणी दिघंची येथील नागरिक सचिन मोहन कावरे व नवनाथ मधुकर रणदिवे यांनी आटपाडी तहसीलदार यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. 
सुरेश आरबळे चे कार्डाप्रमाणे माल देत नाहीत, पावती मागितल्यास तो देण्यास नकार दिला जातो. डाळ मागितल्यास ती संपल्याचे सांगण्यात येते. आहे एवढेच घेवून जावा असे सांगून उद्धटपणाची वागणूक दिली जाते. रेशन कार्डचा १२ अंकी नंबर टाकण्यासाठी ३०० रुपयेची आमच्याकडून सक्तीने वसुली केली, पण त्याची पावती मागितली असता ती देण्यास नकार दिला गेला. अर्वाच्च भाषा वापरून ऑनलाईन कार्ड बंद करण्याची धमकी दिली जात आहे. 
त्यामुळे या रास्तभाव धान्य दुकानदाराची सखोल चौकशी होवून त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी नवनाथ मधुकर रणदिवे व सचिन मोहन कावरे यांनी केली आहे. सदरच्या निवेदनाच्या प्रति गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, सरपंच दिघंची यांना देण्यात आलेल्या आहेत.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured