लॉकडाऊन मध्ये ही जगायचे कसे, सुत्र शिकवतोय हा युवक...


लॉकडाऊन मध्ये ही जगायचे कसे, सुत्र शिकवतोय हा युवक...
माणदेश एक्स्प्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : कांदे, बटाटे, दोडके, वांगी ह्या... ताजी भाजी...... आजी, मावशी. अशी आरोळी देत तो तरून हात गाड्यांवरून फिरुन भाजीपाला विक्री करत आहे. कोरोना चा प्रसार रोखण्यासाठी देशभरात लॉकडाऊन घोषित होऊन महिनाभर झाला. नोकरदार वगळता छोटे-मोठे व्यवसाय बंद राहिले. काहीजण मिळालेल्या मदतीवर अवलंबून राहिले. काहीजणांनी संकटात ही संधी मानून रोजगाराच्या नवीन वाटा शोधल्या. त्या तरुणाचे नाव आहे असित कुमार देव तो मूळचा कलकत्ता येथील आहे. गेल्या सात वर्षापासून आटपाडी येथील चौंडेश्वरी कॉलनी येथे वास्तव्यास आहे. चौंडेश्वरी कॉलनी येथे मच्छी फ्राय सेंटर असून एक वेगळीच चव म्हणून ग्राहकांची गर्दी तेथे असायची. 


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम!
*तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा ! आभार गीत
या लॉकडाऊन मध्ये अनेकांचा रोजगार हरवला. कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ह्या विवंचनेने अनेकांना घेरले. मात्र हा युवक हताश न होता परिस्थितीत मात करत मंडईमध्ये होलसेल मध्ये शेतकऱ्याकडून भाजी खरेदी करून स्वतःच्या हात गाड्या चा आधार घेत शहरातील प्रत्येक भागात गल्लीबोळात फिरून भाजीपाला विक्री करत असून कुटुंबाचा चरितार्थ चालवत आहे. सकाळी मंडईमध्ये जायचे माल खरेदी करायचा, तोंडाला मास्क बांधून दिवसभर भाजीपाला विक्री करत आहे. त्याला बोलते केले असता पोटापुरता मिळतंय समाधानी असून होईल तेवढं काम करायचं, जीवाला दगदग करून घ्यायचं नाही. याच भाजीपाला व्यवसायाने माझा संसार जागवला असून आता तोच आधार आहे असे सांगून हा युवक जगण्याचं सूत्र सांगून ग्राहकाला भाजीपाला देण्यात धन्यता मानतोय. 


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured