सांगलीत आणखी एकाला कोरोनाची लागण 

सांगलीत आणखी एकाला कोरोनाची लागण 


सांगलीत आणखी एकाला कोरोनाची लागण 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगलीच्या विजयनगरमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. सदरचा व्यक्ती बँक कर्मचारी होता. त्याला न्यूमोनिया झाला म्हणून १७ एप्रिल रोजी मिरजच्या सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्याच्यावर न्यूमोनियावर उपचार सुरू असतानाच त्याची करोनाची चाचणीही करण्यात आली होती. त्याचा रिपोर्ट आला असून त्यात त्याला करोनाची लागण झाल्याची झाल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. तो राहत असलेला विजय नगर परिसर सील करण्यात आला असून कुटुंबीयांना क्वॉरंटाइन करण्यात आलं असून त्यांच्याही चाचण्या घेण्यात येत आहेत. तसेच त्यांच्या शेजाऱ्यांनीही क्वॉरंटाइन करण्यात आलं आहे. विजय नगर परिसरातील प्रत्येक गल्ली बॅरिकेड्स लावून सील करण्यात आली आहे. विनाकारण बाहेर फिरणाऱ्यांवर पोलिसांनी ड्रोनच्या माध्यमातून नजर ठेवली आहे. त्यामुळे कोणीही बाहेर पडू नये. या संपूर्ण परिसरामध्ये ३ शिफ्टमध्ये २४ तास पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments