अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून बलात्कार ; जत तालुक्यातील उमदी येथील घटना ; उमदी पोलिसात गुन्हा दाखल


अल्पवयीन मुलीवर शिक्षकाकडून बलात्कार ; जत तालुक्यातील उमदी येथील घटना
माणदेश एक्सप्रेस न्युज
जत :  जत तालुक्यातील उमदी येथे एका अल्पवयीन मुलीवर शिक्षकांने जबरदस्तीने बलात्कार केल्याची घटना 9 एप्रिल 2020 रोजी घडली. याप्रकरणी संशयित शिक्षक सतिश अंकुश कांबळे वय 38 रा. सनमडी यांच्याविरोधात उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे.
पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, 9 एप्रिल रोजी संशयित सतिश कांबळे यांने पिडित 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या घरातून तिला जबरदस्ती स्व:ताच्या घरात घेऊन गेला. तिथे त्यांने तिच्याशी अश्लिल चाळे करत जबरदस्तीने अतिप्रंसग केला. तर असाच प्रकार त्यांने दि. 11 एप्रिल रोजीही केला. सदरची घटना पिडितेने आई-वडीलांना सांगितल्यानंतर त्यांनी उमदी पोलीसात धाव घेवून सदर शिक्षका विरुद्ध तक्रार दाखल केली.


बातमीचा व्हिडीओ पाहण्यासाठी Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured