चेतनसिंह केदार-सावंत यांच्याकडून अजनाळे येथील ४० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप


चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडून अजनाळे येथील ४० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूचे वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : सांगोला तालुका भाजपा अध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्याकडून अजनाळे ता. सांगोला येथील  ४०  गरजू व गरीब गहू, कुटुंबांना तांदूळ, साखर, तेल, डाळ इत्यादी जीवनावश्यक वस्तूचे मोफत वाटप करण्यात आले. राज्यामध्ये संचारबंदी व लॉक डाऊन लागू केल्यामुळे गोरगरीब नागरिकांना वर उपासमारीची वेळ आली आहे. चेतनसिंह केदार यांनी  गोरगरिबांना  मदतीचा हात दिला आहे.
याप्रसंगी सोलापूर जिल्हा दूध संघाचे संचालक विजयदादा येलपले, युवा नेते समाधान धांडोरे, कोतवाल नवनाथ इंगोले, संजय पंडित,  हरी बोरकर, चंद्रकांत कोळवले, सुदर्शन वाघमारे, सोमनाथ धांडोरे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

Previous Post Next Post