दिव्यागांना अडी-अडचणी असल्यास संपर्क करा ;  दिव्यांग प्रतिनिधी निवास पाटील 

दिव्यागांना अडी-अडचणी असल्यास संपर्क करा ;  दिव्यांग प्रतिनिधी निवास पाटील 


दिव्यागांना अडी-अडचणी असल्यास संपर्क करा ;  दिव्यांग प्रतिनिधी निवास पाटील 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : सांगली जिल्ह्यामध्ये कोरोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी शासनाने संचारबंदी लागू केली आहे.सदर संचारबंदीच्या कालावधीमध्ये दिव्यांगांना सोयीसुविधा उपलब्ध होण्यासाठी जिल्हास्तरीय कोरोना सहाय्य दिव्यांग कक्ष स्थापन करण्यात आला आहे. सदर जिल्हास्तरीय कोरोना सहाय्य दिव्यांग कक्षाची स्थापना ही सांगली जिल्हा परिषदेचे मुख्यकायर्कारी अधिकारी अभिजित राऊत व समाज कल्याण अधिकारी राधाकिसन देवढे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली असून सदर समितीचे उद्दिष्ट हे जिल्हास्तरावर दिव्यांगांच्या आलेल्या तक्रारीचे जलद गतीने पाठपुरावा करणे व निराकारण करणे हा असून सांगली जिल्ह्यातील असे दिव्यांग की जे अंथरुणावर खिळून आहेत किंवा कुटुंब प्रमुख आहे अथवा जे कोणी कोणतीही हालचाल करु शकत नाही, अशांना घराबाहेर पडता येत नाही त्यांना रेशन धान्य, अत्यावश्यक मेडिसिन स्थानिक संस्थांकडून मदत त्वरित पोहोचवणे त्याकरिता समन्वयक करण्यासाठी जिल्ह्यातील निवडक पदाधिकारी यांची या कामासाठी निवड केली आहे सदर समितीमध्ये आटपाडी तालुक्यातील दिव्यांगांच्या मागण्यांसाठी, त्यांना मदत करण्यासाठी त्यांच्या प्रश्नांना न्याय देण्यासाठी अग्रक्रमी असणारे दिव्यांग मित्र, निवास पाटील यांची दिव्यांग प्रतिनिधी म्हणून निवड करण्यात आलेली आहे.
याबाबतचा आदेश मिळतात निवास पाटील यांनी पंचायत समिती आटपाडी मध्ये आरोग्य विभागात भेट दिली. त्यानंतर तहसील कार्यालय येथे मीटिंग झाली. त्यावेळी विटा मतिमंद शाळेचे दिनकर लोखंडे व राजाराम बहिरवाल हेही उपस्थित होते. दिव्यांगांना रेशन मिळावे व तसा राज्य शासनाचा निर्णय असताना त्याची लवकरात लवकर अंमलबजावणी व्हावी. तसेच सर्व दिव्यांग लोकाना धान्य मोफत नाही. जे लोक चालु फिरु शकतात त्यांनी दुकानात जाऊन धान्य घावे आणि जे चालु शकत नाहीत त्यानी आपल्या रेशन कार्डावरील २७ ने सुरु होणारा RC न्ंबर दयावा जेणेकरुन धान्य दिंव्यांगाच्या घरापर्यत धान्य पोहच करण्यासाठी सुलभता होईल अशी माहिती पुरवठा खात्यातून सांगण्यात आली आहे. 
तसेच दिव्यांगांनी स्वतःची काळजी घ्यावी, विनाकारण घराचे बाहेर पडू नये. मास्कचा वापर करावा. सर्वांनी गांभीर्याने संचारबंदी चे नियम पाळा कोरोनासारख्या संकटाशी लढताना हिम्मत ठेवा! धीर धरा! असे मत दिव्यांग प्रतिनिधी निवास पाटील यांनी व्यक्त केली. तसेच  कोणत्याही मदतीसाठी ९५६१२१५६०० या क्रमांकावरती संपर्क करण्याचे आवाहन केले आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a comment

0 Comments