होम क्वांरंटाईवाल्यांना कोरोनाचे गांभीर्य समजेना 


होम क्वांरंटाईवाल्यांना कोरोनाचे गांभीर्य समजेना 
कोरोनाच्या महामारी ने संपूर्ण देशात थैमान घातले आहे. प्रत्येक दिवशी कोरोनाबधित संख्येत वाढ होत आहे ही अत्यंत चिंतेची बाब आहे. पाठीमागील 24 तासात देशात एकूण 386 नवे रुग्ण सापडले आहेत. देशातील राज्यांमध्ये कोरोणचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संख्येत महाराष्ट्राने बाजी मारली आहे. महाराष्ट्रात एकूण 335 कोरोनग्रस्तांची  संख्या झाली आहे, तर १७ व्यक्तींचा मृत्यू झाला आहे. पाठीमागील 24 तासात राज्यात 33 नवे रुग्ण सापडले आहेत. त्यामध्ये मुंबईत 30, पुण्यात २, तर बुलढाणा येथील १ जणांचा समावेश आहे. तर राज्यात ७ कोरोना ग्रंस्ताचा मृत्यू झालेला आहे. मृत्यू झालेल्या व्यक्तीमध्ये ५ व्यक्ती या मुंबई, १ पालघर, तर १ व्यक्ती कोल्हापूर येथील आहे. महाराष्ट्रात कोरोणाचा संसर्ग झालेल्या व्यक्तींच्या संख्येत मुंबई व पुण्या पाठोपाठ सांगली जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागला आहे. ही बाब सांगली जिल्ह्यातील जनतेच्या दृष्टीने अत्यंत भयानक आहे. सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरचे चार जण हज यात्रेसाठी सौदी अरेबियाला गेले होते. ते परत भारतात आल्यानंतर सरकारने त्यांना घरातून बाहेर न पडण्याची सूचना दिली होती. या दरम्यान जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनाच्या रोगाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले. तेव्हा भारतातील जनतेने व सरकारने सावधानतेचा पवित्रा घेत, परदेशातून भारतात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करण्याचे ठरवले. इस्लामपूरचे चार जण जेव्हा सौदी अरेबियाच्या यात्रेवरून भारतात आले, त्यावेळी त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांना घरातून बाहेर न पडण्याचे आदेश देऊन, त्यांच्या हातावरती होम क्वांरंटाईनचे शिक्के मारण्यात आले होते. परंतु या महाभागांनी ही गोष्ट गांभीर्याने न घेतल्यामुळे आज इस्लामपूर व सांगली जिल्ह्याला याचे परिणाम भोगावे लागत आहेत. त्यांच्या स्वतःच्या कुटुंबातील 23 जणांना त्यांच्यामुळे कोरोनाचा संसर्ग झालेला आहे. यामध्ये त्यांच्या घरातील मोलकरीण,  त्यांना दूध घालणारा गवळी यांचा ही समावेश आहे. त्याचबरोबर त्यांना भेटण्यासाठी कोल्हापूर येथून आलेली एक नातेवाईक महिला ही या संसर्गाला बळी पडलेली आहेत. आजच्या तारखेला इस्लामपूर मध्ये २५ कोरोनाग्रस्त रुग्ण संख्या झाली आहे. वरील चार महाशय हे धार्मिक यात्रा करून आले होते, म्हणून त्यांच्या संपर्कात जे-जे त्यांचे नातेवाईक मित्र व पाहुणे आले त्यांना त्यांनी आणलेली कोरोणाची भेट देऊन टाकली आहे. या चार व्यक्तींच्या निष्काळजीपणामुळे सांगली व कोल्हापूर जिल्ह्यांना कोरोणाच्या विषाणूंनी विळखा घालण्यास सुरुवात केली आहे. इस्लामपूर सांगली व कोल्हापूर मधील सरकारी यंत्रणा, आरोग्य विभाग यांनी युद्धपातळीवर कोरोणला नियंत्रित करण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. सर्वसामान्य जनता ही वेळोवेळी त्यांना मदत करत आहे, परंतु तरीही कोरोनाची दहशत या तीन शहरांच्या वर पसरल्याचे चिंताजनक वातावरण निर्माण झाले आहे.  हीच अवस्था राज्याची व देशाची झाली आहे.
चीनमध्ये कोरोणाच्या विषाणूने थैमान घातल्यानंतर त्याचा फैलाव हळूहळू जगभर झाला. त्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनच्या रोगाला जागतिक महामारी म्हणून घोषित केले. प्रत्येक देशाला सतर्कतेचा इशारा दिला. भारतानेही ही बाब अतिशय गांभीर्याने घेतली. परदेशातून भारतात येणाऱ्या व आलेल्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी करणे, औषधोपचार करणे, तसेच त्यांना घराच्या बाहेर न पडण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्याचबरोबर कोरोनाचा संसर्ग खंडित करण्यासाठी सर्व शाळा व महाविद्यालये, शासकीय कार्यालये, सार्वजनिक कार्यक्रम, सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम यांच्यावर बंदी घालण्यात आली. नंतरच्या काळात जमावबंदी व संचार बंदीचे आदेश लागू केले. शेवटच्या टप्प्यात धार्मिक कार्यक्रमावर बंदी घालण्यात आली. खरे तर सुरुवातीच्या काळातच सर्व धार्मिक कार्यक्रमावर बंदी घातली असती तर सांगली-कोल्हापूर सह महाराष्ट्रावर आलेले कोरोनाचे संकट काही प्रमाणात तरी कमी झालं असतं. कारण केवळ धार्मिक कार्यक्रमावर बंदी न घातल्यामुळे सौदी अरेबिया येथील हज यात्रेला लोक गेले, दिल्ली येथील मरकझ कार्यक्रमात सहभागी झाले. आज त्यांच्यामार्फत कोरोणाने देशात व राज्यात थैमान घालायला सुरुवात केली आहे.
भारतीय संविधानाच्या माध्यमातून आपण सर्वांनी धर्मनिरपेक्षता या तत्त्वाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे आमच्या देशात कोणताही धर्म किंवा धर्माची तत्त्वे यांना महत्त्व न देता जनहितला महत्व देणे गरजेचे आहे. एखादा धर्म किंवा त्यांची तत्वे जनहिताच्या आड येत असतील तर, त्यांना दूर केलं पाहिजे. जर धर्म, देव, धर्मग्रंथ आणि धार्मिक तत्वे यामुळे जनहितला धोका पोहोचत असेल तर अशा वेळी सरकार व समाजने जनहितासाठि धर्मावर नियंत्रण ठेवले पाहिजे. माणसापेक्षा धर्म व धार्मिक कार्यक्रम महत्त्वाचे नाहीत, कारण धर्म, देव व धार्मिक तत्वे ही माणसाने स्वतःच्या हितासाठी निर्माण केलेली आहेत. मग तो कोणताही धर्म असो. जनहितासाठी अशा धर्म व धार्मिक कार्यक्रमावर तातडीने बंदी घातलीच पाहिजे. जे धर्माचे, धर्मांध ठेकेदार आहेत, जे धर्माच्या नावावर जनहित विस्कळीत करू पाहतात, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर धार्मिक कार्यक्रमाला महत्त्व देऊन जनहित धोक्यात आणतात, त्यांच्यावर कठोर कार्यवाही केली पाहिजे. जे लोक विविध कामासाठी, धार्मिक यात्रेसाठी व कार्यक्रमासाठी परदेशात गेले होते. सरकारने कोरोंनाच्या नियंत्रणासाठी त्यांच्या तपासण्या करून, घरातून बाहेर न पडण्याच्या सूचना केल्या होत्या; एवढेच नाही तर त्यांच्या हातावर होम क्वांरंटाईनचे शिक्के मारले होते. तरी ही या घटनेचे गांभीर्य त्यांनी समजून घेतलं नाही. त्यांनी सार्वजनिक ठिकाणी संचार करून, शासनाचे आदेश धाब्यावर बसवून कोरोनाच्या विषाणूचा संसर्ग वाढवला व शासनाच्या समोर गंभीर स्थिती निर्माण करून ठेवली आहे. खरे तर अशा लोकांच्यावर देशद्रोहाचे खटले भरले पाहिजेत. असे इसम जर सार्वजनिक ठिकाणी संचार करताना सापडले तर जनतेने व सरकारने त्यांना चांगलाच धडा शिकवला पाहिजे. अन्यथा या लोकांच्या पासून समाज व देशाला फार मोठ्या संकटाना सामोर जावं लागेल. अशा लोकांचा बंदोबस्त केल्याशिवाय कोरोनावर आपण नियंत्रण आणूच शकत नाही, अन्यथा कोरोणामुळे संपूर्ण देशाचा व मानवतेचा बळी गेल्याशिवाय राहनार नाही.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured