विठ्ठलापूरकरांनी बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती ग्रामसमितीला द्यावी 


विठ्ठलापूरकरांनी बाहेरून आलेल्या नागरिकांची माहिती ग्रामसमितीला द्यावी 
माणदेश एक्स्प्रेस न्यूज 
दिघंची : विठ्ठलापूर ता. आटपाडी, जि.सांगली गावात बाहेरून मुंबई, पुणे या ठिकाणाहून कोणी आपला नातेवाईक शेजारी किंवा कोणत्याही अनोळखी व्यक्ती गावांमध्ये आल्यास आरोग्य विभाग व ग्रामपंचायत कार्यालय विठ्ठलापूर  यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन सरपंच बाड यांनी नागरिकांना केले आहे. 
जर कोणी मुंबई-पुण्याहून बाहेरून आले असेल तर त्यांना १४ दिवस विठ्ठलापूर हायस्कूल विठ्ठलापूर याठिकाणी होम क्वारंटाईन करण्याची व्यवस्था केलेली आहे. काल दि. 23 रोजी मुंबईहून आलेल्या दोन व्यक्तींना क्वारंटाईन  करण्यात आलेला आहे. तरी याची सर्वांनी योग्य ती खबरदारी घेवून जर कोणी बाहेरून आलेल्या व्यक्तींची माहिती लपविण्याचा प्रयत्न केल्यास व ते उघड झाल्यास त्यांना व त्यांच्या कुटुंबांना मिरज येथे पाठवण्यात येईल येणार आहे. अधिक माहितीसाठी आपत्ती व्यवस्थापन समिती विठलापूर व ग्रामपंचायत कार्यालय विठ्ठलापूर सरपंच 8806363420, पोलीस पाटील 8275177171, गाव कामगार तलाठी 7774009912 व आरोग्य अधिकारी 9156118440 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. 


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured