आटपाडी पोलिसांनी जप्त केल्या गाड्या विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहणावर कारवाई ; कारवाईमुळे शहरात शुकशुकाट

आटपाडी पोलिसांनी जप्त केल्या गाड्या विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहणावर कारवाई ; कारवाईमुळे शहरात शुकशुकाट


आटपाडी पोलिसांनी जप्त केल्या गाड्या
विनाकारण फिरणाऱ्या दुचाकी व चारचाकी वाहणावर कारवाई ; कारवाईमुळे शहरात शुकशुकाट
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : ‘कोरोना’  च्या पार्श्वभूमीवर आटपाडी शहरात सकाळपासूनच पोलिसांनी नाकाबंदी करून रस्त्यावर हिंडणाऱ्या मोटरसायकल जप्त करण्याची मोहीम सुरू केली. त्यामुळे आज दिवसभर आटपाडी शहरातील दिवसभर असणारी रहदारी कमी झाली. साई मंदिर चौक, बस स्थानक परिसर, सांगोला कॉर्नर, ग्रामपंचायत कार्यालयासमोर, आबा नगर चौक याठिकाणी सकाळपासून पोलिसांनी नाकाबंदी केली. रस्त्यावरून हिंडणाऱ्या मोटरसायकलस्वारांची चौकशी करून मोटारसायकल जप्त करण्यास प्रारंभ केला. या मोहिमेत धडक मोहिमेत पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, पोलीस उपनिरीक्षक श्री. पाटील यांच्यासह पोलीस, होमगार्ड यांनी सहभाग घेऊन वाहनचालकांवर कारवाई केली.
गेले आठ-दहा दिवस झाले पोलीस प्रशासन लोकांना घराबाहेर जाऊ नका म्हणून विनंती करीत होते. परंतु काहीतरी निमित्त सांगून सकाळ, संध्याकाळ दिवसभर वाहन चालक आपली वाहने घेऊन रस्त्यावर हिंडत होते. पोलिसांनी रस्त्यावर फिरणाऱ्यांना लाठीचा प्रसाद दिला. पण त्या प्रसादाकडे आटपाडीकरांनी दुर्लक्ष त्यामुळे पोलिसांवर वाहने जप्त करण्याची वेळ आली. 
वाहनासाठी पेट्रोल मिळण्यासाठी स्थानिक कमिटीकडे पत्र मिळण्यासाठी येरझाऱ्या घालत होते. पेट्रोल पंप चालकांनाही पेट्रोल देण्यात घेण्यावरून सातत्याने वाद घालावा लागत होता. पोलीस, महसूल प्रशासन यांना वाहनचालकांची डोकेदुखी झाली होती. परंतु पोलिसांनी केलेल्या आज वाहनचालकांवर केलेल्या कारवाईमुळे रस्त्यावर फिरणारी वाहतूक गर्दी कमी झाली. आटपाडी पोलिसांनी केलेले कारवाईचे अनेकांनी स्वागत स्वागत केले. जप्त केलेल्या मोटारसायकली पोलिसांनी वाहनातून आटपाडी पोलीस ठाणे आवारात लावल्या. 


जप्त केलेय गाड्यामध्ये पेट्रोल निम्याहून अधिक 
पेट्रोल पंपवाले तेल देत नाहीत म्हणून अनेकवेळा वादाचे प्रसंग ओढवले आहेत. पंरतु आटपाडी पोलिसांनी जप्त केलेल्या अनेक गाड्याच्या पेट्रोल टाक्यामध्ये निम्याहुन अधिक असून पेट्रोल आहे. तर काही गाड्यामध्ये पेटोल टाक्यामध्ये पेट्रोल फुल्ल आहे. त्यामुळे नागरिक पेट्रोलची साठेबाजी तर करीत नाहीत ना? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


विनाकारण फिरू नका ; अन्यथा कारवाई अटळ 
आटपाडी शहरासह तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात विनाकारण अनेक नागरिक फिरत अत्यावश्य सेवेच्या नावाखाली फिरत आहे. जर खरेच अत्यावश्य स्वेचे काम असेल तर घरातून बाहेर पडा अन्यथा कडक कारवाईला सामोरे जावे लागले.
बजरंग कांबळे 
पोलीस निरीक्षक,आटपाडी 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a comment

0 Comments