कोरोनाशी लढण्यासाठी निंबवडेत प्रशासकीय यंत्रणा सज्ज :  नंदाताई देठे

कोरोनाशी लढण्यासाठी निंबवडेत प्रशासकीय यंत्रणा सज्ज :  नंदाताई देठे


कोरोनाशी लढण्यासाठी निंबवडेत प्रशासकीय यंत्रणा सज्ज :  नंदाताई देठे
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : जगभर कोरोना च्या बातम्या येत असून दिवसेंदिवस हा विषाणू संख्या वाढवताना दिसत आहे. या पार्श्वभूमीवर सगळीकडे प्रशासकीय यंत्रणा आणि इतर खाजगी संस्था सतर्क होऊन लढा देताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर निंबवडे गावच्या सरपंच नंदाताई देठे यांनी सर्वांची आढावा बैठक घेऊन आशा वर्कर,अंगणवाडी सेविका याना सूचना दिल्या तसेच उपसरपंच पोलिस पाटील सदस्य,आरोग्यसेवक , आरोग्यसेविका, कोतवाल यांच्याशी चर्चा करून विविध उपाययोजना बाबत आखणी केली. यावेळी बाहेरून येणाऱ्या जाणाऱ्या लोकांवर करडी नजर ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या. पोलिस पाटील प्रविण मांडले यांनी नागरिकांना घरीच राहण्याबाबत सूचना करून प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन केले. तर डॉ. कदम यांनी आशा वर्कर याना घ्यावयाची काळजी तसेच लोकांचे आरोग्य कसे तपासावे नोंदी कशा घ्याव्यात याबाबत मार्गदर्शन केले. निंबवडे मध्ये प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याचे सरपंच नंदाताई देठे यांनी माणदेश एक्सप्रेस शी बोलताना यावेळी सांगितले.


गावात आम्ही सर्व बाहेरून आलेल्या व्यक्तींना चेक करून चर्चा करून घरीच राहण्याबाबत कळवले असून आशा वर्कर च्या माध्यमातून वेळोवेळी आढावा घेत आहोत तसेच या रोगाकडे राष्ट्रीय संकट म्हणून पहावे लागणार असून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करत आहे.
संजय कदम
आरोग्यसेवक
प्राथमिक  उपकेंद्र निंबवडे


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments