Type Here to Get Search Results !

सिमाबंदीच्या रस्त्यामध्ये अडकली सोलापूरच्या पालकमंत्र्यांची गाडी ; नातेपुते पोलीसांची धावपळ


सिमाबंदीच्या रस्त्यामध्ये अडकली सोलापूरच्या पालकमंत्र्यांची गाडी ; नातेपुते पोलीसांची धावपळ
माणदेश एक्सप्रेस न्युज
पिंपरी/बाळासाहेब कर्चे : नुकताच पदभार स्वीकारलेले सोलापूर जिल्ह्यचे पालकमंत्री दत्तात्रय (मामा) भरणे यांची गाडी माळशिरस तालुक्यातील भवानी घाटातील सोलापूर-सातारा जिल्हा हद्दीच्या रस्त्यावर अडकल्याने नातेपुते पोलीसांची चांगलीच धावपळ उडाली.
कोरोना विषाणूंचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने प्रत्येक जिल्ह्यातील जिल्ह्याच्या सिमा बंद करण्याचे आदेश पारित केल्याने माळशिरस तालुक्यातील सोलापूर जिल्ह्याचे सर्व सिमारस्ते बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे सोलापूर-सातारा हद्दीवरील नातेपुते-शिंगणापूर हा रस्ता दगड-धोंडे व काटेरी झाडे लावून भवानी घाटामध्ये १० एप्रिल रोजी महसूल प्रशासनाने बंद केला असून त्याठिकाणी पिंपरी येथील ग्रामरक्षक दलाचे पथक २४ तास पहारा देत आहे. मात्र सोलापूर जिल्ह्याचा दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारलेले पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या दोन गाड्यांचा ताफा दहिवडी कडून नातेपुतेकडे येत असताना रात्री ९.०० वाजता जिल्हाबंदीच्या रस्त्यावर अडकला. यावेळी MH-42 AX-111 ही मर्सिडिस गाडी पुढे होती. तर पालकमंत्री असलेली MH-01 CP-0039 ही महाराष्ट्र शासन लिहीलेली गाडी पाठीमागे होती. पुढे रस्ता बंद असल्याचे लक्षात येवून ही पालकमंत्र्यांचे स्विय सहाय्यक यांनी रस्त्याला लावलेल्या काट्या काढून मातीच्या ढिगा-यावरून गाडी नेण्याचा प्रयत्न केला मात्र मध्येच गाडी अडकल्याने प्रवास ठप्प झाला. यावेळी येथे पहारा करीत असलेल्या पिंपरीतील ग्रामरक्षक दलाच्या जवानांनी नातेपूते पोलीसांना बोलावले. तर शिंगणापूर येथून कावडे यांनी ट्रॅक्टर आणून ट्रॅक्टरच्या फळीने मातीचा ढिगारा हटवून ट्रॅक्टरच्या सहाय्याने गाडी काढून दिली. मात्र दिड तास मंत्री महोदयांना भवानी घाटात थांबावे लागले. यावेळी नातेपुते पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक युवराज खाडे, हवालदार, कदम, माळशिरस पंचायत समितीचे सदस्य माऊली पाटील, पोलिस पाटील नानासाहेब कर्चे, विरभद्र कावडे, पत्रकार बाळासाहेब कर्चे,  पिंपरीतील ग्रामरक्षादलाचे जवान, शिंगणापूर येथील तरुण यांनी सहकार्य केले. पालकमंत्र्यांनी सर्वांचे आभार मानले.



पालकमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वीच पदभार स्वीकारला असल्याने गुरुवारी दिवसभर जिल्ह्याचा आढावा घेऊन प्रशासनाला जिल्हाबंदी व संचारबंदीचे आदेश तीव्र करण्याच्या सूचना दिल्या होत्या. तर आदेशाचे उल्लंघन केल्यास गुन्हे दाखल करण्याच्या ही सूचना दिल्या होत्या. आणि त्यानंतर पालकमंत्री पंढरपूर मार्गे कोल्हापूरला जाऊन परत येत असताना गाडी सिमारस्त्यावर अडकली होती. मात्र मीच दिवसभर सूचना देतोय आणि मीच सिमा ओलांडून उल्लंघन करतोय, म्हणूनच गाडी अडकली असे पालकमंत्र्यांनी मिश्किलपणे सांगितले. 


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies