‘चिंटू’ अर्थात जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन 


‘चिंटू’ अर्थात जेष्ठ अभिनेते ऋषी कपूर यांचे निधन 
माणदेश एक्स्प्रेस ऑनलाईन टीम
आटपाडी : बॉलिवूडचे दिग्गज अभिनेते आणि ‘चिंटू’ अर्थात ऋषी कपूर यांनी आज दि. ३० एप्रिल रोजी जगाचा निरोप घेत सगळ्यांना मोठा धक्का दिला. काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने त्यांना तातडीने  रुग्णालयात भरती करण्यात आले होते. परंतु त्यांनी तेथेच अंतिम श्वास घेतला. इरफान खान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे. 


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम!
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा ! आभार गीत
ऋषी कपूर यांचा जन्म ४ सप्टेंबर १९५२ रोजी झाला. १९७० सालच्या मेरा नाम जोकरमध्ये छोटी भूमिका करणाऱ्या ऋषीने १९७३ साली बॉबी ह्या चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तेव्हापासून गेली ४० वर्षे सिनेइंडस्ट्रीत कार्यरत असलेल्या ऋषी कपूर यांनी  आजवर अनेक चित्रपटांमध्ये आघाडीच्या भूमिका बजावल्या आहेत व त्यांना अनेक पुरस्कार देखील मिळाले आहेत. पत्नी नीतू सिंगसोबत त्याची पडद्यावरील जोडी लोकप्रिय होती. ९० व २०००  च्या दशकात नायकाच्या भूमिका करणाऱ्या ऋषी कपूर यांनी वाढत्या वयानुसार आपल्या भूमिकेत बदल केला, कुछ तो है या सिनेमात ऋषी कपूर यांनी रंगविलेला सायको किलर खुर्चीला खिळवुन ठेवतो तर अग्निपथ (नविन) मध्ये रौफलाला हा भीतीदायक वाटतो. तर औरंगजेब सिनेमातील त्यांची भूमिका निर्दयी वाटते.


देशातील, राज्यातील व आपल्या परिसरातील बातम्यासाठी Join Free Whatasapp माणदेश एक्स्प्रेस


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured