ग्रामीण स्त्री शक्ती संस्था गोमेवाडी यांचेकडून गरजू महिलांना आधार  ; ५० शेतमजूर महिला कुटुंबियांना दिले  एक महिन्याचे किराणा सामान 

ग्रामीण स्त्री शक्ती संस्था गोमेवाडी यांचेकडून गरजू महिलांना आधार  ; ५० शेतमजूर महिला कुटुंबियांना दिले  एक महिन्याचे किराणा सामान 


ग्रामीण स्त्री शक्ती संस्था गोमेवाडी यांचेकडून गरजू महिलांना आधार 
५० शेतमजूर महिला कुटुंबियांना दिले  एक महिन्याचे किराणा सामान 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : गोमेवाडी ता. आटपाडी, जि. सांगली येथील ग्रामीण स्त्री शक्ती संस्थाने गरजू महिलांना आधार दिला असून एकूण ५० शेतमजूर महिला कुटुंबियांना दिला एक महिन्याचे किराणा सामान संस्थेच्या वतीने देण्यात आले आहे.
गोमेवाडी गाव आणि परिसरातील शेती कामगार महिलांचे आरोग्य, स्वावलंबन, स्वातंत्र्य, समानता, व्यवसाय प्रशिक्षण, कौटुंबिक अत्याचारातून सोडवणूक, व्यसनमुक्ती यासाठी जाणीव जागृती करून त्यांचा स्वतःचा विकास व्हावा आणि गावाच्या, समाजाच्या पर्यायाने देशाच्या विकासात त्यांचा सहभाग वाढवावा त्यांच्या जगण्याचा स्तर  सुधारावा यासाठी ग्रामीण स्त्री शक्ती संस्था गेली 5, 6 वर्षे काम करीत आहे.
शेती कामगार स्त्री अत्यंत दुर्लक्षित आहे. तिच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी संस्था आरोग्य शिबीर आयोजित करते. यातील 80% स्त्रियांचे Hb 10 पेक्षा कमी आहे. या महिला गोमेवाडी गावाच्या सुमारे 25 की मी परिसरातील द्राक्ष बागातून काम करीत असतात. त्यांची बागातील कीटकनाशके आणि औषधांपासून काळजी घेण्यासाठी संस्थेने 'सेवा सहयोग' पुणे यांच्या सहकार्याने 200 सुरक्षा संच वाटप केले. (संचामध्ये रबरी हातमोजे, मास्क, संरक्षक गॉगल, टोपी चा समावेश होता)
' कोरोना ' मुळे सध्या देशात 'लॉकडाऊन' आहे. त्यामुळे सुमारे 300 शेती कामगार महिलांचा रोजगार बंद आहे. यावर्षी अवकाळी पावसाने शेतीची कामे ही कमी झाली आहेत. यामुळे शेती कामगार महिलांच्या कुटुंबांचा उदरनिर्वाह जो या महिलांवरच बहुतांश अवलंबून असतो,तो कठीण झाला आहे.ग्रामीण स्त्री शक्ती संस्थेला मिळालेल्या देणगी मधून संस्थेने यापैकी ५० शेत कामगार कुटुंब व गरजू कुटुंब ज्या कुटूंबात ४-५ व्यक्तींचा समावेश आहे याचा विचार करून एक महिन्याचा अत्यंत आवश्यक किराणा मालाचे तेल, डाळी, कडधान्ये, साखर, गुळ, मीठ, शेंगदाणे कपड्याचे साबण, पूड साबण वाटप केले आहे. तथापि अजूनही अडचणीत असलेल्या आणखी किमान 100,125 महिलांना हे वाटप करणे आत्यंतिक गरजेचे आहे. त्या दृष्टीने प्रयत्न चालू आहे. यासाठी सर्व ग्रामीण स्री शक्ती च्या कार्यकर्ता नी आपापली जबाबदारी पार पाडली असल्याचे मत संस्थेच्या सौ. सुनेत्रा कुलकर्णी यांनी व्यक्त केले.  


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments