आटपाडीत जीवनाश्यक वस्तूचे वाटप करणार असल्याची अफवेने ग्रामपंचायतसमोर गर्दी 

आटपाडीत जीवनाश्यक वस्तूचे वाटप करणार असल्याची अफवेने ग्रामपंचायतसमोर गर्दी 


आटपाडीत जीवनाश्यक वस्तूचे वाटप करणार असल्याची अफवेने ग्रामपंचायतसमोर गर्दी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/बिपीन देशपांडे : संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर गर्दी  न करण्याचे आवाहन करूनही आटपाडी ग्रामपंचायत पुढे जीवनाश्यक वस्तूचे किट वाटप करणार असल्याचे समजताच शहरातील आबालवृद्ध नागरिक एकत्र येतं ग्रामपंचायतीसमोर भली मोठी रांग लागली होती. सध्या सर्वत्र कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान घातले आहे. सांगली जिल्ह्यातही कोरोनाचे रुग्ण आढळले आहेत. या रोगाचा प्रतिबंध करण्यासाठी सर्वत्र संचारबंदी आणि आणि लॉकडाऊन आदेश जारी करण्यात आला असला तरी आटपाडी शहरात त्याचा पुरता फज्जा उडाल्याचे दिसत होते. आज सोमवारी पहाटेपासून सूचनेचे पालन न करता किट वाटप करणार असल्याचे समजतात शहरातील विविध भागातील नागरिकांनी पिशव्या, पोते घेऊन आल्याचे दिसत होते, सोशल डिस्टन्सिंग चे पालन न करता वारंवार सांगूनही ऐकत नसल्याचे पाहून बाजारपेठेत बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी धाव घेऊन कारवाईचा बडगा उगारल्यानंतर गर्दी पांगली. तरीसुद्धा लोक पोलिसांना चकवा देत होते. यावेळी सरपंच वृषाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता कोणतेही किट वाटप न करता जी काही मदत आहे ती खऱ्या गरजू पर्यंत पोहोचणार असल्याचे सांगितले. अखेर ग्रामपंचायतीने ध्वनीक्षेपाद्वारे आवाहन जाहीर केल्यानंतर गर्दी पांगली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free 


Post a comment

0 Comments