देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर अशा, लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे मनसे अध्यक्ष राज ठाकरे : दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांनी लोकांना दिलासा द्यायला पाहिजे होता 


देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर अशा, लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे : दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांनी लोकांना दिलासा द्यायला पाहिजे होता 
माणदेश एक्सप्रेस न्युज
मुंबई :  देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल तर अशा, लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, दिवे लावून, मेणबत्ती लावा म्हणण्यापेक्षा पंतप्रधानांनी भाषणात लोकांना दिलासा द्यायला पाहिजे होता असे मनसे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले. आज त्यांनी पत्रकार परिषद घेत कोरोना विषयी भूमिका स्पष्ट केली.
कोरोनाने देशाची अन् राज्याची चिंता वाढविली आहे. असे असताना मरकजमध्ये जो प्रकार घडला, अशा लोकांना गोळ्या घालून ठार मारलं पाहिजे, यांना कसली ट्रीटमेंट देताय तुम्ही? या लोकांना देशापेक्षा धर्म मोठा वाटत असेल, किंवा काही कारस्थान वाटत असेल तर यांना जगवायचं कशाला? असा सवाल ही त्यांनी केला.
जर नागरिकांनी लॉकडाऊनचे नियम पाळले नाहीत तर लॉकडाऊन वाढेल, त्यामुळे प्रशासनावर मोठा ताण येईल. हे सगळं तुमच्या एका चुकीने होईल. असे टे म्हणाले. वसईत मरकज कार्यक्रमाला परवानगी नाकारली, त्याबद्दल पोलिसांचं त्यांनी अभिमंदन केले. या दिवसामध्ये जर कोणी काळाबाजार करत असेल त्यांना फोडून काढला पाहिजे, तुम्हाला कुटुंब आहेत की नाही? तुमच्याही अंगलट येईल असं त्यांनी काळाबाजार करणाऱ्यांना ठणकावून सांगितले.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured