आटपाडीत आनंदरावबापू पाटील यांच्याकडून ५०० जीवनाश्यक कीटचे वाटप वाटपावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन ; गरीब व गरजूंना मोठा दिलासा

आटपाडीत आनंदरावबापू पाटील यांच्याकडून ५०० जीवनाश्यक कीटचे वाटप वाटपावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन ; गरीब व गरजूंना मोठा दिलासा


आटपाडीत आनंदरावबापू पाटील यांच्याकडून ५०० जीवनाश्यक कीटचे वाटप
वाटपावेळी सोशल डिस्टन्सिंगचे पालन ; गरीब व गरजूंना मोठा दिलासा
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी :  सोफिकॉम ट्रस्ट, पुणे, श्रमिक मुक्ती दल, समान पाणी वाटप संघर्ष चळवळ,  माणगंगा उद्योग समूह, आटपाडी यांच्या वतीने  आटपाडी व परिसरातील गोर-गरीब शेतमजूर, शेतकरी यांना जीवनाश्यक वस्तु असलेल्या ५०० कीटचे वाटप आटपाडी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मधुकर देशमुख, पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे, माणगंगा उद्योग समुहाचे आनंदरावबापू पाटील, जवळे उद्योग समुहाचे भारतशेठ (आप्पा) जवळे, प्रदीप पाटील (सर),  गुलाबराव पाटील, प्रगतीशील शेतकरी मुरलीधर (आबा) पाटील, राजेंद्र पाटील, मनोहर विभूते यांच्याहस्ते वाटप करण्यात आले. 
आटपाडीमध्ये जीवनाश्यक वस्तू असलेल्या एकूण ५०० कीटचे प्रथमच एवढ्या मोठ्या प्रमाणात वाटप करण्यात आले. तालुक्यामध्ये प्रथम गरीब व गरजू नागरिकांचा सर्व्हे करून माहिती घेण्यात आली होती व तेवढ्याच नागरिकांना यावेळी वाटप करण्यात आले. वाटपावेळी सोशल डिस्टस्निगचा नियम पाळून संचारबंदीचे ही उल्लंघन होणार नाही याचीही दक्षता घेतलेली होती. आनंदरावबापू पाटील यांच्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल उपस्थितांमध्ये कौतुक केले जात होते. तर या उपक्रमाचा आदर्श इतरांनी घेवून जीवनाश्यक साहित्याचे वाटप केल्यास संचारबंदी व लॉकडाऊन काळात गरिबांना मदत होणार आहे. सदरच्या कार्यक्रमाचे नियोजन युवा नेते मनोज पाटील, कृषी विद्यालयाचे प्राचार्य विशाल यादव, रवी लांडगे यांनी केले.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments