आटपाडीत पोलिसांनी मोकाट फिरणाऱ्यांच्या मोटारसायकली केल्या जप्त 


आटपाडीत पोलिसांनी मोकाट फिरणाऱ्यांच्या मोटारसायकली केल्या जप्त 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलिसांनी  शहरातील आबानगर चौक, आण्णाभाऊ साठे चौक, आटपाडी ग्रामपंचायत समोरील बाजार पटांगण, सांगोला चौक व एसटी बस स्थानक चौकात नाकाबंदी करून रस्त्यावर फिरणाऱ्या अनेक मोटरसायकली जप्त केल्या. 
कोरोना या संसर्ग विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून संचारबंदी व लॉकडाऊन असतानादेखील रस्त्यावर बेफिकीर फिरणारे वाहनचालक व तोंडाला मास्क न लावणारे लोक यांच्या विरोधात दररोजच मोहीम सुरू आहे. सांगलीहून जिल्हा पोलीस प्रमुख सुहेल शर्मा यांनी विशेष पथक पाठवून ड्रोन कॅमेरा द्वारे आटपाडी शहराची पाहणी केली. नियमाचे उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकावर आटपाडी पोलिसांनी कारवाई केली होती. ड्रोन कॅमेरा द्वारे पकडलेल्या वाहनचालकाला पकडून वाहने जप्त केली होती. तरी देखील ही आज पुन्हा रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर हिंडणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाई केली. पकडलेली वाहने पोलीस ठाण्यात लावण्यात आलेली आहेत, सदरची कारवाई पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.


दैनिक माणदेश एक्सप्रेसच्या बातम्या whatasapp वर Free मिळवण्यासाठी खाली दिलेल्या लिंक ला क्लिक करा


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured