Type Here to Get Search Results !

मेटकरवाडी येथे कुऱ्हाड व काठीने मारहाण


मेटकरवाडी येथे कुऱ्हाड व काठीने मारहाण
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यातील मेटकरवाडी येथे दोघांना कुऱ्हाड व  काठीने मारहाण झाल्याची घटना दिनांक 23 रोजी सकाळी ९.३० च्या सुमारास मेटकरवाडी ता. आटपाडी, जि. सांगली येथे घडली. याबाबत आरोपी अण्णा सरगर, संदीपन सरगर, विनायक माने व अन्य एका विरोधात आटपाडी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सौरभ दादासो मेटकरी याने फिर्याद दिली आहे.
याबाबत आटपाडी पोलीस स्टेशन कडून मिळालेली माहिती अशी, यातील आरोपी आण्णा सरगर याने यातील फिर्यादी  सौरभ मेटकरी यास यास तुझ्या आईचे अनैतिक संबंध नाहीत, तरीदेखील तुम्ही माझी इज्जत लोकांमध्ये घालवली आहे असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यामध्ये कुर्हा डीने वार केला. तसेच त्यांना सोडवण्यासाठी दादासो मेटकरी आले असता त्यास आरोपी धिरज माने याने काठीने व लाथाबुक्यांनी मारहाण व शिवीगाळी करून दमदाटी केली आहे. याबाबत पोलिस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक कांबळे अधिक तपास करीत आहेत.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies