अजनाळेतील बेघर वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य ; ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ठिकठिकाणी गटारीचे काम अपूर्ण ; ग्रामपंचायतीने दाखल घेण्याची मागणी

अजनाळेतील बेघर वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य ; ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ठिकठिकाणी गटारीचे काम अपूर्ण ; ग्रामपंचायतीने दाखल घेण्याची मागणी


अजनाळेतील बेघर वसाहतीमध्ये घाणीचे साम्राज्य
ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे ठिकठिकाणी गटारीचे काम अपूर्ण ; ग्रामपंचायतीने दाखल घेण्याची नागरिकांची मागणी 
अजनाळे/सचिन धांडोरे : अजनाळे तालुका सांगोला येथील बेघर वसाहतीमध्ये  गेल्या  तीन वर्षापासून गटारीचे काम पूर्ण झाले.  मात्र  ठेकेदाराच्या  मनमानी कारभारामुळे  दोन ते तीन ठिकाणी  गटारीचे काम  अपूर्ण राहिल्यामुळे  त्याठिकाणी  पाणी साठवून  त्यामध्ये  घाणीचे साम्राज्य  निर्माण झाले आहे. गटार दुरुस्त करण्यासंदर्भात ग्रामपंचायतकडे वेळोवेळी लेखी व तोंडी तक्रार  देऊन सुद्धा ग्रामपंचायतीने याची कसलीही दखल घेतली नाही.त्यामुळे प्रशासनाच्या या गलथान कारभारामुळे  नागरिकांना विविध आजारांना सामोरे जावे लागत आहे. तरी ग्रामपंचायतीने याची तात्काळ दखल घेऊन बेघर वसाहतीमधील गटारीचा कायमस्वरूपी प्रश्न मार्गी लावा अशी मागणी येथील राहणाऱ्या नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments