Type Here to Get Search Results !

विजयनगर येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने  कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


विजयनगर येथे कोरोना बाधित रूग्ण आढळल्याने  कंटेनमेंट आराखड्याच्या अंमलबजावणीस सुरूवात : जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : विजयनगर, सांगली येथील न्युमोनिआचा रूग्ण असणाऱ्या एकाची कोरोना चाचणी  पॉझीटीव्ह आल्याने जिल्हा प्रशासनाने अत्यंत गतीमान हालचाली करत सदर व्यक्तीच्या राहत्या घरापासून 1 कि.मी. त्रिजेचा परिसर कंटेनमेंट झोन केला आहे. खबरदारीचा उपाय म्हणून या परिघाबाहेरील 5 कि.मी. त्रिजेचा परिसर बफर झोन केला आहे. 55 ठिकाणी बॅरीगेटस् लावण्यात आले आहेत. सदर कोरोना बाधीत व्यक्तीच्या निकट संपर्कात आलेल्या 27 व्यक्तींना आयसोलेशन / इंस्टीट्युशनल क्वारंटाईनमध्ये ठेवून कोरोना चाचणीसाठी त्यांचे स्वॅब घेण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिली.
कोरोना बाधीत व्यक्तीवर 17 एप्रिल पासूनच मिरज सिव्हील येथील आयसोलेशन कक्षात उपचार सुरू आहेत. सदर व्यक्तींने कोणत्याही प्रकारचा पदरेश प्रवास केलेला नाही. तसेच कोरोना पॉझीटीव्ह पेशंटच्या सानिध्यात आल्याचेही अद्यापपर्यंत निदर्शनास आलेले नाही. या व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या अन्य व्यक्तींची माहिती घेण्याचे काम डिस्ट्रीक्ट रॅपीड रिसपॉन्स टीम मार्फत सुरू असल्याचे सांगून जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कंटेनमेंट झोन मध्ये महानगरपालिका व आरोग्य यंत्रणेमार्फत 50 घरांमागे एक पथक नेमून पुढील 14 दिवस सर्व्हे करण्यात येणार आहे. 
बफर झोन मध्येही घरोघरी सर्व्हे करण्यात येईल. फिवर क्लिनिक सुरू करण्यात आली असून मागणीनुसार अधिकची फिवर क्लिनिक सुरू करण्यात येतील. कंटेनमेंट झोन मध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रतिबंधात्मक साधन सामुग्री देण्यात येत आहे. निर्जंतुकीकरणाची कार्यवाही महानगरपालिकेने सुरू केली आहे. ज्या ठिकाणाहून वाहने प्रवेश करतील व बाहेर जातील अशा ठिकाणी वाहनांचेही सॅनिटायझेशन करण्यात येईल. महापालिकेमार्फत कंटेनमेंट झोनमध्ये जीवनावश्यक वस्तुंची घरपोच सेवा देण्याची व्यवस्था केली आहे. कोरोना बाधीत रूग्णाची प्रकृती गंभीर आहे. कोविड-19 च्या प्रोटोकॉल नुसार ट्रिटमेंट सुरू आहे, असेही जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies