Type Here to Get Search Results !

दक्षता कमिटी  नावालाच; ग्रामसेवक तलाठी, गावाकडे फिरकेनात; सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती


दक्षता कमिटी  नावालाच; ग्रामसेवक तलाठी, गावाकडे फिरकेनात; सांगोला तालुक्यातील ग्रामीण भागातील परिस्थिती
माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : एकीकडे सोलापूर जिल्ह्यासह सांगोला तालुक्यात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत  असताना सांगोला तालुक्यामधील अनेक गावांमध्ये गाव कामगार तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, सचिव, ग्रामीण भागाकडे फिरकत नसल्याचे चित्र सध्या ग्रामीण भागात पाहावयास मिळत आहे.
कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव पातळीवर नियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गावामध्ये दक्षता कमिटीचे स्थापना करण्यात आले आहे. मात्र काही अधिकारी ग्रामीण भागात फिरकत नसल्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखवली जात आहे.  


हे ही वाचा :-  मेंढपाळ बांधवांना गावाला येऊ द्या : पुष्पाताई सरगर यांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन


त्यामुळे ग्रामीण भागामध्ये पोलीस पाटील, सरपंच   यांनाच गावा वरती नियंत्रण राखावे लागत आहे. कोरोना व्हायरस ने आता ग्रामीण भागातही शिरकाव केल्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देऊन जे अधिकारी ग्रामीण भागाकडे फिरकत नाहीत अशा अधिकाऱ्यावरती निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी सांगोला तालुक्यामधील ग्रामीण भागातून केली जात आहे.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !



ग्रामसेवक, तलाठी यांनी ग्रामीण भागामध्ये बाहेरगावाहून आलेल्या नागरिकावरती लक्ष ठेवून त्यांना तात्काळ नोटीस देण्यासाठी गावात असणे अपेक्षित आहे मात्र तेच गावात येत नसल्यामुळे आपत्ती व्यवस्थापनाचा गावात बोजवारा उडत आहे. जिल्हाधिकारी व तहसीलदार यांनी  जे अधिकारी ग्रामीण भागामध्ये फिरकत नाहीत त्यांना तात्काळ सूचना देऊन ग्रामीण भागामध्ये जाऊन गावावरती लक्ष ठेवावे अशी मागणी ग्रामीण भागातून होवू लागली आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies