कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव हेच  कुटुंब मानून  संपूर्ण गावाची काळजी घेत आहे कोतवाल

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव हेच  कुटुंब मानून  संपूर्ण गावाची काळजी घेत आहे कोतवाल


कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गाव हेच  कुटुंब मानून  संपूर्ण गावाची काळजी घेत आहे कोतवाल माणदेश एक्सप्रेस न्युज
अजनाळे/सचिन धांडोरे : कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर हाहाकार माजवला आहे. त्यामुळे सरकारने राज्यात संचारबंदी व लाँकडाउन 3  मे पर्यंत जाहीर केले आहे. शासनाकडून या रोगाला प्रतिबंध घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न सुरू आहेत.  मोठ्या शहरातून गावाकडे आपल्या मूळ गावी आल्यामुळे त्यामुळे गाव पातळीवर काम करणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेवर मोठ्या प्रमाणात जबाबदारी निर्माण झाली आहे. अजनाळे गावातील कोतवाल नवनाथ इंगोले हे कोरोना विषाणू च्या संकटात राष्ट्रीय काम चोख बजावत असल्याचे चित्र सध्या अजनाळे गावात पाहावयास मिळत आहे. तुटपुंज्या मानधनावर काम करणाऱ्या कोतवाल यांना गाव हेच कुटुंब मानून संपूर्ण गावाची काळजी घेत आहेत. अजनाळे गावांमध्ये 5 हजार 278 लोकसंख्या असून प्रशासनाच्या आरोग्य कर्मचारी ग्रामपंचायत कर्मचारी  ग्रामसेवक सरपंच पोलीस पाटील इतर घटकांसोबत खांद्याला खांदा लावून कोरोनाशी दोन हात करताना कोतवाल दिसत आहेत. गाव हेच कुटुंब म्हणून गावाची काळजी केली जाते.  सोलापूर जिल्ह्यामध्ये कोरोनाग्रस्तांची संख्या  दिवसेंदिवस  वाढू लागली आहे. त्यामुळे ग्रामीण भागामध्ये कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून कोतवाल नवनाथ इंगोले हे गावामध्ये दररोज सकाळी लवकर येऊन नागरिकांना शासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करा व कोरोना रोगाला गावातून हद्दपार करूया म्हणून काम करीत आहेत.गाव कामगार तलाठी किरण बाडीवाले यांच्या मार्गदर्शनाखाली गावामध्ये दररोज येऊन कोरणा विषाणू संदर्भात नागरिकांमध्ये जनजागृती करून बाहेर जाणाऱ्या नागरिकास मज्जाव करून गावातच थांबण्यास बंधनकारक करत आहे व बाहेरून येणाऱ्या नागरिकास विचारपूस करून गावात प्रवेश दिला जातो.
कोतवाल नवनाथ इंगोले


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments