निंबवडेकरांना मदतीसाठी तरुणाई सरसावली


निंबवडेकरांना मदतीसाठी तरुणाई सरसावली
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे येथे कोरोना च्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीत गरजू व्यक्तींना किराणा मालाच्या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्याचे आवाहन न्यू माणदेश युथ फाउंडेशनच्या करण्यात आले होते व त्याची सुरवात स्वतःपासून करण्यात आली होती. या आवाहनाला प्रतिसाद देत युवा उद्योजक किरण घुटुकडे यांनी निंबवडे गावात 10 किराणा मालाचे किट वाटप केले. तर युवा नेते प्रतापसिह मोटे यांनी 10 किट चे वाटप केले. या प्रसंगी सरपंच, उपसरपंच, पोलिस पाटील, पत्रकार यांनी तयार केलेल्या यादीनुसार गरजू व्यक्तींना देण्यात आले याबद्दल या दोन्ही युवकांचे गावकऱ्यांनी कौतुक केले आहे. 


 


गावामध्ये कोरोना मुळे अनेकांचे हातावर पोट असून त्यांची अडचण झाल्याचे समजल्यानंतर आमचे बंधू न्यू माणदेश युथ फाउंडेशन चे अध्यक्ष दिलीप मोटे यांनी केलेल्या आवाहनानुसार मदत करत आहे भविष्यात सुद्धा लोकांच्या पाठीशी उभा राहणार आहे.


प्रतापसिह मोटे, युवा नेते, निंबवडेमी उद्योगानिमित्त बाहेर असतो आता गावी आलो आहे लोक अडचणीत असलेले समजल्यानंतर मी स्वतः मदत करून खारी चा वाटा उचलण्याचा प्रयत्न केला आहे तसेच मी माझ्या मूळ गावी गारुडी येथे सुद्धा गावकऱ्यांना किराणा मालाचे वाटप केले आहे संकटात असलेल्या लोकांच्या मदतीला आम्ही कायम सोबत आहोत 


किरण घुटुकडे, युवा उद्योजक


 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


 


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured