आटपाडीमध्ये साठवून ठेवलेल्या पेट्रोलचा स्फोट ; दोनजण जखमी 

आटपाडीमध्ये साठवून ठेवलेल्या पेट्रोलचा स्फोट ; दोनजण जखमी 


आटपाडीमध्ये साठवून ठेवलेल्या पेट्रोलचा स्फोट ; दोनजण जखमी 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडीमध्ये साठवून ठेवलेल्या पेट्रोलचा स्फोट होऊन दोनजण जखमी झाले. 
याबाबत घटनास्थळा वरून मिळालेली माहिती अशी की, सुजमाल यादव हा कुटुंबासह आटपाडी येथील साठेनगर येथे भाड्याने राहत आहे. संचारबंदीमुळे आपल्या मुळ गावी जाण्यासाठी त्याने पेट्रोल घरातील प्लास्टिक कॅनमध्ये साठा करून ठेवले होते.  घरामध्ये स्टोव्ह होता त्या स्टोव्हच्या  उष्णतेने पेट्रोलने पेट घेतला व  स्फोट झाला. यात सुजमाल यादव गंभीररित्या जखमी झाला. तर दुसरा एक जण किरकोळ जखमी झाला. स्फोटामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले. यावेळी नागरिकांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ पोलिसांना व रुग्णवाहिकेला बोलविले. यावेळी  जखमींना आटपाडीच्या ग्रामीण रुग्णालययेथे दाखल करण्यात आले आहे. परंतु अद्याप पर्यंत या घटनेची पोलीसामध्ये नोंद झाली नाही.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments