गरीब व निराधारना धान्य, साखर वाटप

गरीब व निराधारना धान्य, साखर वाटप


गरीब व निराधारना धान्य, साखर वाटप
माणदेश एक्सप्रेस न्युज
अकलुज/प्रतिनिधी : राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांनी यशवंतनगर मधील शिवतेजनगर, माळेवाडी येथील विद्यानगर, माळीनगर येथील २१ चारी येथील गरजू, गरीब, निराधार व खरोखरच ज्या लोकांना गरज आहे अशांना धान्य व साखर वाटप केली.
देशासह महाराष्ट्र राज्यात लॉकडाउन व संचारबंदी असल्याने सर्वसामान्य गरीब, गरजू व निराधार जनतेला अनेक समस्यांना सामोरे जावे लागत असून दैनंदिन जीवनातील असलेल्या गरजाही भागवताना त्यांना अडचणी येत आहेत. त्यांना कुठेही कामाला जाता येत नाही. त्यामुळे त्यांच्या रोजच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ज्या लोकांची खरोखरच अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने सोलापूर जिल्हा सरचिटणीस किरण साठे यांच्या हस्ते धान्य व साखर वाटप करण्यात आले.
यावेळी कोळी महासंघाचे अध्यक्ष सागर कोळी, बहुजन ब्रिगेडचे माढा लोकसभा अध्यक्ष सोमनाथ शेळके, अनिल साठे, आनंद मिसाळ, सूरज मोहिते, रहीम तांबोळी इत्यादी उपस्थित होते.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments