सांगली जिल्ह्यात पुन्हा कोरोनाचा शिरकाव ; वाळवा तालुक्यातील दोघांना कोरोनाची लागण ; दोघेही कराडच्या कृष्णा हॉस्पिटल चे कर्मचारी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील कामेरी व कासेगाव येथील दोघांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. हे दोघेही कराडच्या कृष्णा हॉस्पिटलचे कर्मचारी आहेत. त्यामुळे इस्लामपूर सोडून आता कोरोनाने रुग्ण भागातील सापडू लागले आहेत. तालुका आरोग्य विभाग व पोलीस प्रशासनाने कामेरी व कासेगाव ही गावे सील कर्ली असून मोठा बंदोबस्त तैनात केला आहे. तसेच रुग्णाची संबंधित लोकांना क्वारंनटाईन करण्यात आले आहे. ज्या भागात चे कोरोनाग्रस्त राहत होते त्या भागात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. कृष्णा हॉस्पिटल मध्ये काम करणाऱ्या एकूण सात लोकांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून त्यातील हे दोघे जण असल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी यांनी दिली.
Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज