उन्नती महिला विकास फौंडेशनच्या वतीने गरिबांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप 

उन्नती महिला विकास फौंडेशनच्या वतीने गरिबांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप 


उन्नती महिला विकास फौंडेशनच्या वतीने गरिबांना जीवनाश्यक वस्तूचे वाटप 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कोरोना संकटामुळे लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर अडचणीत सापडलेल्या गोर गरीब, उपेक्षित,  वंचित, असहाय्य, अगतिक वृध्द, अंध , अपंग, महिला,  बालकांना मायेचा आधार देण्याच्या कामाने उन्नती फौडेशनने वादळी अंधारात मानवतेच्या प्रेमाची ज्योत प्रज्वलीत करण्याचा केलेला प्रयत्न सर्वत्र कौतुकास पात्र ठरू लागला आहे.
आटपाडी व परिसरातल्या अनेक गोरगरीब, आदिवासी, वनवासी, परप्रांतीय  कुटुंबाचे खूप हाल होत आहेत. हातावरचे पोट असणाऱ्या लोकांना दोन वेळचे जेवण मिळणे मुश्किल झाले आहे. अनेकांवर जीवन मरणाचा प्रसंग ओढवला आहे. आटपाडीतील उन्नती महिला विकास फौंडेशन ने एकल, गरजू महिलांसह अन्य अनेकाना मदतीचा हात दिला आहे, तेल, मूगडाळ, गहू, तांदूळ, साखर, शेंगदाणे, चहा पावडर, साबण अशा अनेक जीवनाश्यक साहित्याचे वाटप केले. तसेच देशमुखवाडी, जाधवमळा येथील बालके यांना मास्क व किराणा मालाचे कीट वाटप केले. 
यावेळी सौ.शीतल चोथे, प्रिया गायकवाड, सुनीता जाधव, वनिता फुले, उज्वला सुतार, विद्या पाटील, रूपाली मोकाशी, विजया राऊत, मीना सागर, अनिता जाधव यांनी मोठी  मदत केली.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments