कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मिरज येथील प्रयोगशाळेला कोणतीही साधनसामग्री कमी पडू देणार नाही : -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी

कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मिरज येथील प्रयोगशाळेला कोणतीही साधनसामग्री कमी पडू देणार नाही : -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी


कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेल्या मिरज येथील प्रयोगशाळेला कोणतीही साधनसामग्री कमी पडू देणार नाही : -जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगली : कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रयोगशाळेला कोणत्याही परिस्थितीत उपकरणे, साधनसामग्री कमी पडू देणार नाही अशी ग्वाही जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी दिली. यावेळी त्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ संजय साळुंखे यांना आवश्यक साधन सामग्रीसाठी तात्काळ प्रस्ताव सादर करण्याचे निर्देशही दिले. मिरज येथे सुरु करण्यात आलेल्या प्रयोगशाळेमध्ये तपासण्यात येणाऱ्या स्वाबच्या सॅम्पल्सची मर्यादा वाढविण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना कराव्या लागतील आणि त्यासाठी कोणती साधनसामग्री खरेदी करावी लागेल यादृष्टीने जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी मिरज सिव्हिल हॉस्पिटल येथे बैठक घेऊन आढावा घेतला. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे, मिरज वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधिर नणंदकर, मायक्रोबायोलॉजीच्या विभागप्रमुख डॉ. कुलकर्णी, डॉ पंकज जोशी उपस्थित होते.
यामध्ये ऑटोमॅटीक न्यूक्लीक ॲसिड एक्सट्रॅक्शन सिस्टिम ची आवश्यकता असून यामुळे सध्या मॅन्युअली जे काम होते ते मशीन आल्यामुळे कपॅसिटी वाढेल. यासाठी आपत्ती व्यवस्थापन फंडामधून 16 लाख रूपयाची तरतूद करण्यात आली आहे आहे तसेच त्याच्या खरेदीची प्रक्रियाही सुरू करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. साळुंखे यांनी दिली. याशिवाय मायक्रोसेंट्री फ्यूज मशीन, आरएनआय एक्स ट्रॅक्शन किट्स, व्ही.टी.एम किट्सचे, बायो सेफ्टीक कॅबिनेट,डीप फ्रीज यासाठीचे प्रस्ताव तात्काळ सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी दिले. मिरज शासकीय महाविद्यालय उपकरणे व कुठल्याही साधन सामुग्रीमध्ये खंड पडणार नाही,असे ही त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a comment

0 Comments