तोंडाला मास्क न लावल्याने चिकमहूद येथील ७ जणाविरुद्ध सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल 


तोंडाला मास्क न लावल्याने चिकमहूद येथील ७ जणाविरुद्ध सांगोला पोलीस स्टेशनला गुन्हे दाखल 
माणदेश एक्सप्रेस न्युज
सांगोला/प्रतिनिधी : मा. जिल्हाधिकारी सो सोलापुर यांचेकडील आदेशाचा भंग करून सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरल्याबद्दल मौजे चिकमहुद ता. सांगोला, जि. सोलापूर येथील १. परवीन रहीमान मुलानी, २. रहीमान महंदम मुलानी, ३. साहील रहीमान मुलानी, ४. शेरखान रहीमान मुलानी, ५. मुन्नाबी इब्राहीम मुलानी, ६. इब्राहीम रसुल मुलानी, ७. रसुल दस्तगीर मुलानी यांच्या विरुद्ध भा. द. वि. क. १८८, २६९, २७०, तसेच राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायदा सन २००५ चे कलम ५१ (ब), महाराष्ट्र पोलीस कायदा सन १९५१ चे कलम ३७(३)/१३५, साथीचे रोग प्रतिबंधक अधिनियम सन १८९७ चे कलम २, ३ व ४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, वरील गुन्हा दाखल करण्यात आलेले लॉक चे तोंडास मास्क न लावता, सोशल डिस्टन्स न ठेवता सांगोला पोलीस ठाणे येथे एकत्र आले. त्याना पोलीस ठाणेस एकत्र येण्याचे कारणाबाबत विचारपुस केली असता " किरकोळ भांडणे झाली आहेत, परंतु आम्हाला तकार दयायची नाही' असे ७ जणानी एकत्र येवुन तोंडी सांगुन लेखी म्हणणे ठाणे अंमलदार पोना. विशाल लेंडवे यांच्याकडे सादर केले. त्यामुळे कोरोना प्रादुर्भाव रोखणेकरीता कोणतीही दक्षता न घेता अनावश्यकपणे घराबाहेर पडुन मा. जिल्हाधिकारी सो यांच्या आदेशाचा भंग केल्याचे दिसुन आलेने त्यांच्याविरुध्द कारवाई करण्यात आली आहे. 
अनावश्यकपणे घराबाहेर पडणे ही घटना गंभीर स्वरुपाची असल्याने लागलीच याबाबत कर्तव्यावरील मपोकॉ. ज्योती सातवेकर यांनी स्वतः वरील ७ आरोपीनी केलेल्या गुन्हयाच्या अनुषंगाने ७ आरोपीविरुध्द सरकारतर्फे सांगोला पोलीस ठाणेस तक्रार दिलेने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्हयाचा तपास पोना. अभिजित मोहोळकर करीत आहेत. 
अशा प्रकारचा गुन्हा दाखल होण्याची सांगोला तालुक्यातील पहीलीच वेळ असुन याद्वारे विनाकारण पोलीस ठाणेस येणारे लोकांवर अंकुश ठेवणे व त्याना कायदयाचे पालन करण्यास भाग पाडणे हा प्रमुख उद्देश आहे. याद्वारे पोलीस निरीक्षक सांगोला यांच्याकडुन जनतेला आवाहन करण्यात येत आहे की, संचारबंदी व लॉक डाउनच्या काळात कोणीही विनाकारण घराबाहेर पडु नये, कोणीही अशा प्रकारे विनाकारण कोणत्याही कार्यालयात किंवा इतरत्र कोठेही फिरताना मिळुन आल्यास त्यांच्याविरुध्द वरीलप्रमाणे ठोस कायदेशीर कारवाई करण्यात येईल. सदरची मोहिम अधिक तीव्र करुन ठोस कायदेशीर कारवाई करणार असलेचे पो. नि. राजेश गवळी सांगोला पोलीस ठाणे यानी कळविलेले आहे. लॉकडाउन व संचारबंदी काळात कोणीही घराबाहेर पडु नये, मास्कचा वापर करावा असे आवाहन करण्यात आलेले आहे.


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured