घरगुती गॅसची साठेबाजी ; एकाला अटक 


घरगुती गॅसची साठेबाजी ; एकाला अटक 
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : हिवतड ता. आटपाडी येथील राहुल भरत म्हमाणे याला घरगुती गॅसची साठेबाजी केल्याप्रकरणी त्याच्यावर आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्याकडून १६ घरगुती गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत.


हे ही वाचा :- विठ्ठलापूर मध्ये अज्ञाताकडून आकसापोटी वाईट कृत्य


याबाबत अधिक माहिती अशी की, हिवतड ता. आटपाडी येथील राहुल भरत म्हमाणे हा घरगुती गॅस टाकीचा काळा बाजार करीत असल्याची माहिती सांगलीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला मिळाली होती.


जीवाची पर्वा न करता डॉक्टर, नर्स, पोलीस, सफाई कमर्चारी यांनी केलेल्या कार्याला सलाम !
तू विठ्ठल, मौला, मेरा, तु आसरा सबकुछ मेरा !त्यांनी हिवतड येथे छापा मारला असता राहुल राहुल भरत म्हमाणे याच्याकडे १६ घरगुती गॅस सिलेंडरच्या टाक्या आढळून आल्या त्याच्याकडून ३१५६० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याप्रकरणी पोलीस निरीक्षक बजरंग कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक कांबळे अधिकतपास करीत आहेत.  


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Featured