Type Here to Get Search Results !

निंबवड्यात मदतीचा ओघ सुरूच, वाढदिवसानिमित्त शिधा वाटप !


निंबवड्यात मदतीचा ओघ सुरूच, वाढदिवसानिमित्त शिधा वाटप !
माणदेश एक्सप्रेस न्युज
निंबवडे/राघव मेटकरी : निंबवडे ता. आटपाडी, जि. सांगली येथे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गोर गरिबांची चूल पेटती राहावी यासाठी विशेष प्रयत्न होत असताना दिसत असून काल सलग तिसऱ्या दिवशी माजी उपसरपंच बाळासाहेब मोटे यांच्या वाढदिवसानिमित्त किराणा मालाचे किट वाटप करण्यात आले.
मागच्या दोन दिवसांपासून सलगपणे लोक पुढे येत असून याची सुरवात नामदेवशेठ मोटे यांच्यापासून झाल्यानंतर काल डी.टी. मोटे यांच्या वतीने किराणा मालाचे किट गावात वाटण्यात आले होते. काल वाढदिवसानिमित्त बाळासाहेब मोटे यांनी किट वाटप करून गरजू व्यक्तींना दिलासा देण्याचा प्रयत्न केला. यावेळी माजी उपसरपंच बाळासाहेब मोटे, शिक्षक जयंत देठे, पोलिस पाटील प्रवीण मंडले, आदर्श शिक्षक अशोक मोटे यांची विशेष उपस्थिती होती. 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies