Type Here to Get Search Results !

श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीचे प्रा.सदाशिव मोरे यांच्याकडून कोरोनाची अशी ही जनजागृती


श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडीचे प्रा.सदाशिव मोरे यांच्याकडून कोरोनाची अशी ही जनजागृती
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : कोरोना विरुद्धच्या लढाईत आपलाही काहीतरी सहभाग असावा, असे प्रत्येक व्यक्तीाला वाटत असते. मग तो सहभाग कशाच्याही माध्यमातून असू शकतो. कोणी पैशाच्या माध्यमातून, आरोग्यसेवेच्या माध्यमातून तर कोणी गरजुंना अन्न पुरविण्याच्या माध्यमातून या महामारीच्या लढाईत आपले योगदान देत आहेत. यामध्ये आता प्राध्यापक ही मागे राहिलेले नाहीत. 




श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालय आटपाडी, येथे कार्यरत असणारे प्रा.सदाशिव मोरे हे असेच एक आगळे-वेगळे व्यक्तिमत्व म्हणून प्रसिद्ध आहेत. श्रीमंत बाबासाहेब देशमुख महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनाच्या वतीने प्रा. सदाशिव मोरे हे काळामळा, य.पा.वाडी, माडगूळे, मासाळवाडी, आटपाडी या ठिकाणी सायकलवरून कोरोनाची नागरिकांमधून जनजागृती करीत आहेत. सायकलवरून स्पीकर लाऊन त्याद्वारे ते कोरोनाचे महत्त्व ज्या-ज्या ठिकाणी जात आहेत त्या ठिकाणी लोकांना सांगत असून त्याचे महत्व सर्वांना पटवून देत आहेत. सुरक्षित रहा, घरीच रहा, प्रशासनाचा आदेश पाळा, सोशल डिस्टन्सिंग चे नियम पाळा असे आवाहन करीत आहेत. त्यांच्या या कार्याचे अनेकाकडून कौतुक होत आहे.


Join Free Whatasapp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies