Type Here to Get Search Results !

म्हसवड शहरात मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना आळा बसण्यासाठी पोलीसांकडून लॉगमार्च ; मीच माझा व कुटुंबाचा रक्षक, कुटुंबासह घरात की एकटे रुग्णालयात? तूम्हीच ठरवा चा संदेश


म्हसवड शहरात मोकाट फिरणाऱ्या नागरिकांना आळा बसण्यासाठी पोलीसांकडून लॉगमार्च ;  मीच माझा व कुटुंबाचा रक्षक, कुटुंबासह घरात की एकटे रुग्णालयात? तूम्हीच ठरवा चा संदेश
माणदेश एक्सप्रेस न्युज
म्हसवड/अहमद मुल्ला : कोरोनाला रोखण्यासाठी सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आले असून नागरीकांना घरात राहण्याचे आवाहन प्रशासनामार्फत वारंवार करण्यात येत असून देखील अद्याप विनाकारण रस्त्यावर फिरणारांची संख्या म्हसवड शहरात वाढत आहे. याला आऴा बसवण्यासाठी पोलीसांकडून अनेक प्रकारे प्रयत्न केले जात आहे. या मोकाट लोकांना आळा बसवण्याकरीता म्हसवड पोलीसांनी शहरातून लॉग मार्च काढून नागरीकांनी घराबाहेर पडू नये असे आवाहन केले जात आहे. 
नागरीकांना वारंवार सूचना देवूनही अनेक रिकामटेकडी काहीतरी कारणे सांगून रस्त्यावर भटकत आहेत. पोलीसांनी अडवले तर भाजीपाला किंवा औषधाचे कारण सांगून वेळ मारुन नेहली जात आहे.



जुन्या औषधांच्या चिट्ठ्या दाखवून अथवा दुधाची किटली अथवा जुन्या घरातील गोळ्या खिशात टाकून पळवाटा काढताना दिसून येत आहेत. म्हसवड शहरात अशाप्रकारे लॉकडाऊनची सर्रास पायमल्ली होत असल्याचे दिसून येत आहे. याला प्रतिबंध घालण्यासाठी सातारा जिस्ह्याचे जिल्हाधिकारी शेखर  सिंग यानी सकाळी ९ ते ११ ते व  संध्याकाळी  ७ ते ९ अत्यावश्यक सेवा बजावणाऱ्याना  अशी वेळ ठरवून दिली आहे. या दिलेल्यावेळे शिवाय जर कोण रस्त्यावर आले तर मात्र निश्चित कारवाई केली जाईल असे सपोनि गणेश वाघमोडे यांनी लॉग मार्च दरम्यान स्पष्ट केले आहे. प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करुन प्रत्येकाने कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये याची खबरदारी घेतली पाहिजे प्रत्येकाने घरी राहून प्रशासनाला सहकार्य केले पाहिजे अन्यथा कठोर कारवाई केली जाईल .कटुंबासह घरात रहायचे की एकटे रुग्णालयात रहायचे हे तूम्हीच ठरवा, असे आवाहन करत म्हसवड पोलीस, म्हसवड नगरपालीका, प्राथमिक आरोग्य केंद्र यांनी लॉग मार्च केले.


 


Join : whatasapp दैनिक माणदेश एक्सप्रेस Free


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Ads Placemaent

Hollywood Movies